शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
3
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
4
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
7
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
8
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
9
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
10
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
11
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
12
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
13
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
14
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
15
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
16
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
17
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
18
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
19
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
20
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?

Kolhapur: राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे उघडले, ८५४० क्यूसेक विसर्ग सुरु; पंचगंगेच्या पातळीत वाढ होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 15:23 IST

काेल्हापूर शहरासह जिल्ह्यातील शेकडो कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर

गौरव सांगावकर राधानगरी/कोल्हापूर :  धरणपाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार असल्याने धरणपाणीसाठ्यात वाढ होत आहे. राधानगरी धरण १०० टक्के भरल्याने धरणाचे एकूण चार स्वयंचलित दरवाजे आज, बुधवारी (दि.२६) सकाळी उघडले. या चार दरवाज्यातून  ५७१२ क्युसेक तर वीज निर्मिती केंद्रातून १४०० क्युसेक असा एकूण ७११२ क्यूसेक विसर्ग भोगावती नदी पात्रात सुरु आहे. पाणी पातळी ३४७.३६ फूट इतकी आहे. संभाव्य पुरपरिस्थिती लक्ष्यात घेवून जलसंपदा विभागाच्यावतीने नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.  धरणाचा क्रमांक सहा चा स्वयंचलित दरवाजा सकाळी ८:१५ मिनीटांनी उघडला. तर पाठोपाठ सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी  क्रमांक ५ चा  स्वयंचलित दरवाजा उघडला. यानंतर १०:०३ मिनिटांनी क्र. ३ व १० वाजून ०६ मिनिटांनी क्रमांक ४ असे एकूण क्रमांक ३,४,५,६ दरवाजे उघडले. त्यानंतर दुपारी १ :२३ मिनिटांनी पाचवा दरवाजा उघडला. असे एकूण क्रमांक ३,४,५,६,७ या पाच दरवाज्यातून  ७१४० क्युसेक तर वीज निर्मिती केंद्रातून १४०० क्युसेक असा एकूण ८५४० क्यूसेक विसर्ग भोगावती नदी पात्रात सुरु आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात धरणाचे दरवाजे उघडले होते. या वर्षी मात्र मुसळधार पावसामुळे दरवाजे जुलै अखेरच उघडले.जिल्ह्यात काल, मंगळवारी दिवसभर पावसाचा जोर कमी झाला असला तरी धरण क्षेत्रात जोरदार पाऊस कोसळत आहे. धरणातून विसर्ग सुरु झाल्याने पंचगंगा नदीची पातळीत वाढ होणार आहे. दरम्यानच पन्हाळा तालुक्यातील धारवाडी डोंगर खचल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.मंगळवारी दुपारपर्यंत पावसाची उघडझाप राहिल्याने नद्यांचे पाणी संथगतीने वाढत आहे तरीही कोल्हापूरकरांच्या मनात महापुराची धास्ती आहे. जिल्हा प्रशासनाने सतर्कता म्हणून नदीकाठच्या गावांचे स्थलांतर सुरू केले आहे. काेल्हापूर शहरासह जिल्ह्यातील शेकडो कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर केले आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने आगामी दोन दिवस जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज’ अलर्ट दिला आहे.पडझडीत २३.६८ लाखांचे नुकसानजिल्ह्यात मंगळवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत ५६ खासगी मालमत्तांची पडझड झाली आहे. त्यामध्ये २३ लाख ६८ हजारांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.‘एसटी’चे ३४ मार्ग बंदपुराचे पाणी रस्त्यावर आल्याने जिल्ह्यातील वाहतूक काहीशी ठप्प झाली आहे. एस.टी.चे ३४ मार्ग बंद झाले आहेत, तर १३ इतर जिल्हा मार्ग व १९ ग्रामीण मार्ग बंद झाले आहेत.अलमट्टी ५८ टक्के भरलेअलमट्टी धरण केवळ ५८ टक्के भरल्याने पुराचे पाणी गतीने पुढे सरकत आहे. या धरणातून सध्या प्रतिसेकंद ८८५७ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अलमट्टी धरणावर कोल्हापुरातील पुराची स्थिती अवलंबून असल्याने सगळ्यांच्या नजरा या धरणाकडे लागल्या आहेत.बालिंगा पूल वाहतुकीसाठी बंदचभोगावती नदीवरील बालिंगा पूल हा सव्वाशे वर्षांपूर्वीचा असून, मध्यंतरी त्याची डागडुजी केली होती. मात्र, सुरक्षितेच्या कारणासाठी मंगळवारी वाहतुकीसाठी पूल पूर्णपणे बंदच करण्यात आल्याने नागरिकांची गैरसाेय झाली आहे.जिल्ह्यातील २७ गावांतील शाळा बंदजिल्ह्यातील नद्यांना आलेला पुराचा विचार करता करवीर, हातकणंगले, शिरोळ या तालुक्यातील २७ गावातील शाळांना आज, बुधवारी सुटी देण्यात आली आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसDamधरणWaterपाणीriverनदीfloodपूर