शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

व्यवस्थापकासह चौघांना अटक

By admin | Updated: August 18, 2014 00:05 IST

सिलिंडरचा काळाबाजार : कोल्हापुरातील दोघांचा समावेश

सांगली : गॅस सिलिंडरच्या काळाबाजारप्रकरणी अटकेत असलेल्या मुख्य संशयित शाहरुख खतीब यास सिलिंडरचा पुरवठा करणाऱ्या सांगलीतील संजयनगरमधील खेराडकर गॅस एजन्सीचा व्यवस्थापक शशिकांत पाटील यांच्यासह चौघांना आज, रविवारी सकाळी अटक करण्यात आली. यामध्ये कोल्हापुरातील दोन व्यापारी व फरारी असलेल्या खोली मालकाचा समावेश आहे. खेराडकर गॅस एजन्सीच्या रेकॉर्डची तपासणी केली जात आहे. त्यांच्याकडे काम करणाऱ्या कामगारांनाही ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे. दरम्यान, खतीबला सिलिंडरचा पुरवठा करणाऱ्या कोल्हापुरातील आणखी एकाचे नाव निष्पन्न झाले आहे. त्याच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक रवाना करण्यात आले आहे. अटक केलेल्यांमध्ये व्यवस्थापक शशिकांत कलगोंडा पाटील (वय ४३, रा. लिंगायत गल्ली, कुपवाड), व्यापारी मोहित सुरेशचंद्र गुप्ता (३२, ताराबाई पार्क, कोल्हापूर), नरेंद्रभाई गोकुळभाई पटेल (४८, रूईकर कॉलनी, कोल्हापूर), खोलीचा मालक शब्बीर दस्तगीर अथणीकर (५२, शिवशंभो चौक, कर्नाळ रस्ता, सांगली) यांचा समावेश आहे.  खतीब याने अथणीकर यांची शिवशंभो चौकातील खोली भाड्यानेघेऊन तिथे घरगुती व व्यावसायिक सिलिंडरचा बेकायदा साठा केला होता. तो इलेक्ट्रीक मोटारीने गॅस भरुन देण्याचा व्यवसाय करीत होता. चार दिवसांपूर्वी गुन्हे अन्वेषणने छापा टाकून ५० सिलिंडर, चार इलेक्ट्रीक मोटारी जप्त केल्या होत्या. त्याने इलेक्ट्रीक मोटारी गुप्ता व पटेल या व्यापाऱ्यांकडून खरेदी केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे या दोन्ही व्यापाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. या दोन्ही व्यापाऱ्यांचा वाहनांचे गॅसकिट विक्रीचा व्यवसाय आहे. ते मूळचे गुजरातचे आहेत. व्यवसायाच्यानिमित्ताने ते पंधरा वर्षापूर्वी कोल्हापुरात स्थायिक झाले आहेत.जप्त करण्यात आलेल्या ५० सिलिंडरपैकी २० सिलिंडर खेराडकर गॅस एजन्सीचा व्यवस्थापक शशिकांत पाटील याने दिल्याचे खतीब याने सांगितले आहे. यामुळे पाटीलला अटक केली आहे. एजन्सीमधील महत्त्वाचे रेकॉर्ड ताब्यात घेऊन तपासणी केली जात असल्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप चव्हाण यांनी सांगितले. ते म्हणाले, खेराडकर एजन्सीकडे सभासदांना घरपोच सिलिंडरचा पुरवठा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कामगार आहेत. या कामगारांनाही ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे. चौकशीत ज्यांची नावे पुढे येतील, त्या सर्वांना अटक केली जाईल. कोणालाही सोडले जाणार नाही. सिलिंडरचा काळाबाजार केल्याप्रकरणी यापूर्वी रेकॉर्डवर आलेल्या संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांचीही चौकशी सुरु आहे. (प्रतिनिधी) कोल्हापुरात छापेखतीबला कोल्हापुरातील एका व्यक्तीने २० ते २५ सिलिंडरचा पुरवठा केल्याचे निष्पन्न झाले आहे. या व्यक्तीचा शोध सुरू आहे. त्याच्या शोधासाठी एक पथक रवाना करण्यात आले असल्याचे उपनिरीक्षक चव्हाण यांनी सांगितले. ते म्हणाले की, तो सापडल्यानंतर त्याचे नाव जाहीर केले जाईल. येत्या एक-दोन दिवसांत त्याला अटक करण्यात यश येईल. यामध्ये मोठी साखळी आहे. या प्रकरणाचा तपास कोल्हापूर जिल्ह्यापर्यंत पोहोचला आहे. गरज पडल्यास तेथील पोलिसांची मदत घेतली जाणार आहे.