Kolhapur Crime: जयसिंगपुरातील तरुणाच्या खूनप्रकरणी चौघांना अटक, दोघे फरार; ऐन दिवाळीत खून झाल्याने उडाली होती खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 14:16 IST2025-10-24T14:15:23+5:302025-10-24T14:16:48+5:30
आरोपींनी दिली खुनाची कबुली

Kolhapur Crime: जयसिंगपुरातील तरुणाच्या खूनप्रकरणी चौघांना अटक, दोघे फरार; ऐन दिवाळीत खून झाल्याने उडाली होती खळबळ
जयसिंगपूर : ऐन दिवाळीत लक्ष्मी पुजनादिवशीच पूर्व वैमनस्यातून तरुणाचा धारदार चाकूने वार करून खून झाल्याची घटना जयसिंगपुरात घडली होती. सुनील किसन पाथरवट (वय ३१) असे मृताचे नाव असून खूनप्रकरणी सहा जणाविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून यातील चौघा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
शेखर महादेव पाथरवट (वय-३०), सागर परशुराम कलकुटगी (३१) ला बसवाना खिंड, तमदलगे परिसरातून तर विजय लक्ष्मण पाथरवट (४३), संजय लक्ष्मण पाथरवट (४७) यांना चौंडेश्वरी फाटा परिसरातून अटक करण्यात आली आहे. संशयित आरोपींना न्यायालयाने २८ ऑक्टोबरपर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे. तर रोहीत पाथरवट व शिवानंद पाथरवट हे दोघे संशयित फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पूर्व वैमस्यातील राग डोक्यात ठेवून मंगळवारी लक्ष्मी पुजन झाल्यानंतर मध्यरात्री जुन्या वादातून सुनिलला लाथाबुक्यांनी मारहाण करत चाकुने सपासप वार करून गंभीर जखमी केल. सुनिलला सांगली सिव्हील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी विशाल शिवाजी पवार यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी खुनाची कबुली दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.