शिवसेनेच्या माजी आमदाराचा उपोषणाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:21 IST2021-01-21T04:21:53+5:302021-01-21T04:21:53+5:30
शिरोळ : आमदार स्थानिक विकास निधीतून शववाहिका खरेदीस विलंब केल्याप्रकरणी शिवसेनेचे माजी आमदार उल्हास पाटील यांनी जयसिंगपूर मुख्याधिकारी यांना ...

शिवसेनेच्या माजी आमदाराचा उपोषणाचा इशारा
शिरोळ : आमदार स्थानिक विकास निधीतून शववाहिका खरेदीस विलंब केल्याप्रकरणी शिवसेनेचे माजी आमदार उल्हास पाटील यांनी जयसिंगपूर मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन उपोषणाचा इशारा दिला आहे. दीड वर्षापूर्वी निधी वर्ग करण्यात आला होता. त्याबाबत अद्यापही कार्यवाही झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
आमदार स्थानिक निधीतून व जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांच्या मान्यतेने २०१९-२० या आर्थिक वर्षात शववाहिका खरेदीकरिता जयसिंगपूर नगरपालिकेच्या खात्यावर १५ लाख २५ हजार रुपयांचा निधी वर्ग केला होता. खरेदी प्रक्रिया करण्याऐवजी कागदी घोडे नाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. याबाबत तात्काळ निर्णय घ्यावा, अन्यथा उपोषणाचा इशारा माजी आमदार पाटील यांनी दिला आहे.
नगरसेवक पराग पाटील, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख मधुकर पाटील, तालुकाप्रमुख वैभव उगळे, तेजस कुराडे, बाबा सावगावे आदींनी उपमुख्याधिकारी पवन म्हेत्रे यांना निवेदन दिले. याप्रश्नी मुख्यमंत्र्यांसह, नगरविकासमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
फोटो - २००१२०२१-जेएवाय-०३
फोटो ओळ - जयसिंगपूर येथे उपमुख्याधिकारी पवन म्हेत्रे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बाबा सावगावे, वैभव उगळे, मधुकर पाटील, पराग पाटील उपस्थित होते.