शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

माजी खासदार विश्वासदाजी पाटील यांचे निधन

By admin | Updated: June 15, 2017 23:44 IST

माजी खासदार विश्वासदाजी पाटील यांचे निधन

लोकमत न्यूज नेटवर्कशिरटे : येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथील माजी खासदार व राजारामबापू सहकारी दूध संघाचे संस्थापक-अध्यक्ष अ‍ॅड. विश्वासराव तथा विश्वासदाजी रामराव पाटील (वय ८३) यांचे गुरुवारी (दि. १५) अल्पशा आजाराने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर कऱ्हाड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच गुरुवारी सकाळी अकरा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. सायंकाळी त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार विश्वासदाजी पाटील यांची राजकीय कारकीर्द १९६०च्या दरम्यान सुरू झाली. काँग्रेसचे तालुका, जिल्हा चिटणीसपदासह उपाध्यक्षपद सांभाळल्यानंतर १९७०च्या दरम्यान त्यांनी जनता पक्षात प्रवेश केला. १९७२ मध्ये राजारामबापू पाटील यांच्यामुळे ते जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष झाले. पुढे ११ वर्षे ते जिल्हाध्यक्ष होते. नंतर जनता पक्षाचे राज्याचे उपाध्यक्ष व राष्ट्रीय सरचिटणीस अशी पदेही त्यांनी भूषविली. १९८० मध्ये वसंतदादा पाटील, १९८३ मध्ये शालिनीताई पाटील व १९८५ मध्ये प्रकाशबापू पाटील यांच्याविरोधात विश्वासदाजी पाटील यांनी सांगली मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती. पुढे पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात ते कऱ्हाडमधून लोकसभेच्या रिंगणात उतरले होते. परंतु कोणत्यात निवडणुकीत त्यांना यश आले नाही. मात्र १९८८ ते ९३ या काळात जनता पक्षाने त्यांना राज्यसभेवर काम करण्याची संधी दिली. इस्लामपूर येथील राजारामबापू दूध संघाच्या स्थापनेत त्यांचा सिंहाचा वाटा होता. दूध संघाच्या स्थापनेपासून सलग १३ वर्षे त्यांनी अध्यक्षपद भूषविले.त्यांच्या पश्चात दोन भाऊ, पत्नी, राजारामबापू दूध संघाचे माजी संचालक व राजारामबापू पाटील बँकेचे संचालक अ‍ॅड. संग्राम पाटील आणि प्रसाद ही दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन विधी शनिवार, दि. १७ रोजी येडेमच्छिंद्र येथे होणार आहे.विश्वासदाजी पाटील यांचा मृतदेह कऱ्हाड येथून सायंकाळी पाच वाजता येडेमच्छिंद्र येथे आणण्यात आला. गावातील प्रमुख मार्गावरून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. दाजींच्या निधनाचे वृत्त समजताच येडेमच्छिंद्र येथील शाळांना सुटी देण्यात आली. गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.सायंकाळी सात वाजता मुलांनी मुखान्नी दिला.