माजी महापौर शिवाजी सुंठकरही कारवाईचे धनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:53 IST2021-09-02T04:53:15+5:302021-09-02T04:53:15+5:30

शिवाजी सुंठकर यांची भाजप पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. असा आदेशच निघाला आहे. यामुळे आता सुंठकर भाजपचे सक्रिय नसून ...

Former mayor Shivaji Sunthakar is also a master of action | माजी महापौर शिवाजी सुंठकरही कारवाईचे धनी

माजी महापौर शिवाजी सुंठकरही कारवाईचे धनी

शिवाजी सुंठकर यांची भाजप पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. असा आदेशच निघाला आहे. यामुळे आता सुंठकर भाजपचे सक्रिय नसून मराठीसाठी काम करणारे अशी गणना होणार असून मराठी भाषिकांच्या सहानुभूतीचा फायदा त्यांना या आणि यापुढे होणाऱ्या निवडणुकात होणार हे नक्की बनले आहे.

शिवाजी सुंठकर यांना भाजप पक्षात घेण्यास भाजपमधील काहींचा सुरुवातीपासून विरोध होता. त्यांना पक्षातून बाजूला करण्याचे प्रयत्नही अनेकदा झाले; पण यश आले नव्हते. काही व्यक्ती त्यांच्यावरील कारवाईसाठी कारण शोधत होते. आता भाजपमध्ये राहून सुंठकर मराठी एकीसाठी काम करत आहेत हे दाखवून देऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याने सुंठकर यांचे महत्व मराठी माणसाच्या मनात आणखी वाढणार असून संबंधित पक्षाचा खरा चेहरा उघड झाला आहे.

Web Title: Former mayor Shivaji Sunthakar is also a master of action