शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

अपघातग्रस्त महिलेला माजी फुटबॉलपटंूची मदत

By admin | Updated: November 21, 2015 00:40 IST

कौतुकास्पद काम : महागड्या उपचार खर्चासाठी सुरू आहे संघर्ष

कोल्हापूर : वाशी (ता. करवीर) येथे एका वळणावर तवेरा गाडीची रिक्षाला धडक बसली. त्यातून प्रवास करणाऱ्या भाजी विक्रेत्या कमल शिवाजी मोरे (वय ४५, रा. मंगळवार पेठ) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. घरची परिस्थिती गरीब असल्याचे समजल्यानंतर शिवाजी तरुण मंडळाच्या माजी फुटबॉलपटूंनी त्यांच्या उपचाराकरिता दहा हजार रुपये हॉस्पिटल प्रशासनाकडे शुक्रवारी दिले. अपघातग्रस्त कमल या वाशी येथे आपल्या भाजी विक्रेत्या मैत्रिणींसह देवदर्शनासाठी गेल्या होत्या. घरी परतत असताना वाटेत एका मोठ्या वळणावर अचानक समोरून आलेल्या तवेरा गाडीने या रिक्षाला धडक दिली. यावेळी रिक्षाचालक व अन्य महिला बाहेर फेकल्या गेल्या. या धडकेने रिक्षातील कमल व अन्य महिला रिक्षासह फरफटत गेल्या. त्यात कमल यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. प्रथम त्यांना सीपीआर रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी राजारामपुरी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचाराचा खर्च मोठा असल्याने मोरे कुटुंबीयांना उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज होती. ही गरज कानी पडताच शिवाजी तरुण मंडळाचे माजी फुटबॉलपटू प्रा. अमर सासने, मनोज जाधव, रणजित इंगवले, संदीप पाटील, रमेश पाटील, सुनील जाधव, विकास पाटील, सुनील जाधव, धनाजी सूर्यवंशी यांच्यासह मनोज जाधव (ज्युनिअर), सुहास साळोखे, योगेश वणिरे, नीलेश जाधव, संतोष तावडे यांनी तत्काळ १० हजार रुपयांची मदत हॉस्पिटल प्रशासनाकडे शुक्रवारी जमा केली आहे. ( प्रतिनिधी )दानशूरांच्या मदतीची गरजकमल या राष्ट्रीय शालेय फुटबॉलपटू ओंकार मोरे यांच्या मातोश्री आहेत. त्या कपिलतीर्थ मार्केटमध्ये लिंबू विक्रीचा व्यवसाय करतात. ओंकारसह त्यांना काजल ही मुलगी आहे. त्यांच्या चरितार्थ केवळ लिंबू विक्रीच्या व्यवसायातून चालतो. त्यामुळे कमल यांना समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीची आवश्यकता आहे.