शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरचा फॉर्म्युला पाळा, अन्यथा तोडी बंद

By admin | Updated: November 6, 2016 00:36 IST

रघुनाथदादा पाटील : जिल्हाधिकाऱ्यांनी तोडगा काढावा; कार्यकर्त्यांची सांगलीत निदर्शने

सांगली : यंदाच्या एकरकमी एफआरपीसह टनास १७५ रुपये जास्त देण्याच्या कोल्हापूरच्या फॉर्म्युल्यापेक्षा एक रुपयाही कमी सांगली जिल्ह्यातील शेतकरी घेणार नाहीत. कारखानदारांनी दराची घोषणा केल्याशिवाय तोडी होऊ देणार नाही, असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी शनिवारी सांगलीत पत्रकार परिषदेत दिला. जिल्हाधिकाऱ्यांनी साखर कारखानदारांशी चर्चा करून दराची घोषणा करावी, अन्यथा आंदोलनामुळे जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संघटना त्यास जबाबदार राहणार नाही. यासंबंधीचे निवेदन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांना संघटनेने दिले आहे.पाटील म्हणाले की, उसाची तोडणी झाल्यापासून चौदा दिवसात शेतकऱ्यांना एफआरपी आणि त्यावर १७५ रुपये दिले पाहिजेत. त्यानंतर हंगाम बंद होताना सर्व हिशेब करून उपपदार्थ नसणाऱ्या कारखान्यांनी एकूण साखरेच्या ७० टक्के रक्कम शेतकऱ्यांना द्यावी आणि उर्वरित ३० टक्के रकमेत त्यांचा खर्च भागवायचा आहे. उपपदार्थ निर्मिती करणाऱ्या कारखान्यांनी ७५ टक्के रक्कम शेतकऱ्यांना द्यायची आहे आणि उर्वरित २५ टक्के रकमेत खर्च भागवायचा आहे. याचा सर्व हिशेब केल्यानंतर शेतकऱ्यांना अंतिम दर प्रतिटन ३५०० रुपयेच मिळणार आहे. यामुळे या बैठकीतील तोडगा आम्हाला मान्य आहे, असे ते म्हणाले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी याप्रश्नी निदर्शनेही केली. (प्रतिनिधी) तीव्र आंदोलन!सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारांना कोल्हापूरचा फॉर्म्युला मान्य नसेल, तर त्यांनी त्यापेक्षा जादा दर द्यावा. परंतु, त्यापेक्षा एक रुपयाही कमी घेतला जाणार नाही. कारखान्यांनी गळीत हंगाम सुरु करण्यापूर्वी दर जाहीर करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. एकाही कारखान्याची तोड चालू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.