शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्हा परिषदेत महायुतीच्या पाचजणांना ‘स्वीकृत’ची संधी; काँग्रेसला दोन जागा, निवड करताना नेत्यांची दमछाक

By समीर देशपांडे | Updated: March 19, 2026 12:24 IST

सविस्तर अधिकृत माहितीची प्रतीक्षा

समीर देशपांडेकोल्हापूर : महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या दुसरी सुधारणा विधेयक मंगळवारी विधानसभेत एकमताने मंजूर झाल्यामुळे कोल्हापूरजिल्हा परिषदेसाठी सात स्वीकृत सदस्य घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सदस्यसंख्येच्या १० टक्के स्वीकृत सदस्य निश्चित करण्यात आल्याने ६८ सदस्य संख्येसाठी ७ सदस्य नियुक्त करता येणार आहेत. यामध्ये महायुतीचा पाच आणि काँग्रेसला दोन जागा मिळण्याची शक्यता आहे.जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसाठी ७ फेब्रुवारीला मतदान झाले आणि ९ फेब्रुवारीला निकाल लागला असून मंगळवारीच अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड झाली आहे. तीन महिन्यांपूर्वीच महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये स्वीकृत सदस्य घेण्याची मागणी केली होती.त्याचवेळी ही मागणी पूर्ण होणार याची खात्री अनेकांना होती. त्यानुसार सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून मंगळवारी १७ मार्च रोजी विधानसभेत या कायद्यातील दुरूस्ती मंजूर करण्यात आली. त्यानुसार आता स्वीकृत सदस्य निवडीबाबत सविस्तर निकष आणि सूचना आल्यानंतर तीही प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत माघारीसाठी अनेकांना ‘स्वीकृत’चा शब्द देण्यात आला होता. त्यामुळे आता ज्यांना शब्द दिला आहे त्यांचा नेत्यांच्या मागे घोषा लागणार आहे. ६८ पैकी बहुतांशी सदस्य हे सभागृहात नवीन आहेत. नेत्यांच्या घरातील पत्नी, मुलगी आहेत. परंतु सभागृहामध्ये आणि एकूणच कामकाजात समन्वय राहण्यासाठी महायुतीच्या नेतेमंडळींकडून जाणीवपूर्वक काही कार्यकर्त्यांना स्वीकृतपदी संधी मिळणार असल्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादी, काँग्रेसला प्रत्येकी दोन जागाराष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला सात पैकी प्रत्येकी दोन अशा चार जागा मिळणार आहेत. राष्ट्रवादीचे २० सदस्य असल्याने त्यांना दोन तर काँग्रेसच्या १५ जागा आणि उद्धवसेना व स्वाभिमानीचे दोन सदस्य मिळून १७ सदस्य होत असल्याने त्यांनाही दोन जागा मिळतील असे सांगण्यात येते. तर भाजप, शिंदेसेना आणि जनसुराज्यला प्रत्येकी एक स्वीकृतची जागा मिळणार आहे.

सविस्तर अधिकृत माहितीची प्रतीक्षामंगळवारी विधानसभेत दुरूस्ती मंजूर झाली असली तरी अजूनही याबाबत लेखी सविस्तर मार्गदर्शक सूचना जिल्हा परिषदेला प्राप्त होण्यास काही दिवस जातील. त्यानंतरच याबाबतची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : MahaYuti gets chance for nominated members in Kolhapur Zilla Parishad.

Web Summary : Kolhapur Zilla Parishad can appoint seven nominated members after legislative approval. MahaYuti likely secures five seats, Congress two. Selection pressures leaders due to prior commitments and balancing experience with new members.