शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

‘गोकुळ’च्या पाच कर्मचाऱ्यांचे राजीनाम

By admin | Updated: December 10, 2014 00:30 IST

महादेवराव महाडिक यांचा दणका : मुंबईतील दूध चोरीप्रकरण भोवले; ठेका रद्द करण्याच्या निर्णयास स्थगितीे

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघातील (गोकुळ) मुंबईत दूध गैरव्यवहारप्रकरणी संघाने आज पाच अधिकारी व कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी थेट नोकरीचे राजीनामेच घेतले. आमदार महादेवराव महाडिक यांनीच संबंधित कर्मचाऱ्यांना स्वत:हून राजीनामे लिहून देण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर या प्रकरणाला वेगळेच वळण लागण्याची चिन्हे आहेत.मुंबईतील संघाचा ढमाल नावाचा वितरक (मूळचा कराड येथील) महिन्यापूर्वी संघाच्या वाशी शीतकरण केंद्रातून म्हशीच्या दुधाच्या पॅकिंग केलेल्या पिशव्या नेत होता परंतु पैसे भरताना मात्र तो गायीच्या दुधाचे भरत होता. ढमाल हा संघाचा १९९१-९२ पासून वितरक आहे. त्याने पोटएजन्सी नेमली होती. पोटएजन्सीच्या व्यक्तीकडून ही चोरी सुरू होती. दिवाळीच्या काळात दुधास प्रचंड मागणी होती. त्यावेळी मुंबईतून दिवसाला साडेसात लाख लिटर दूध विक्री होत होती. त्यामुळे या काळात बाहेर जाणाऱ्या ठराविकच गाड्या तपासल्या जात होत्या. त्यातील त्रुटींचा आधार घेत टोन्ड दुधाच्या गेटपासवर म्हशीचे दूध नेण्याचा हा प्रकार तीन ते चार दिवस सुरू होता. ही गोष्ट संघाच्याच यंत्रणेच्या निदर्शनास आल्यावर त्याबद्दल व्यवस्थापनाकडे तक्रार झाली. त्याची स्वतंत्र अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात आली.१८२० लिटर दूध त्याने फसवणूक करून नेल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. त्यानुसार त्याच्याकडून २ लाख ७० हजार रुपये दंड भरून त्याचा ठेका रद्द करण्यात आला. त्यामुळे या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला होता परंतु या प्रकरणाला संघातील अंतर्गत राजकारणातून नव्याने तोंड फुटले. हा रद्द करण्यात आलेला ठेका मिळावा यासाठीही काहीजणांचे प्रयत्न आहेत. तोदेखील पदर या घडामोडींमागे आहे. संघाने केलेल्या चौकशीत संघाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे संशयाची सूई वळल्याने पाच कर्मचाऱ्यांना आज राजीनामे देण्याचे आदेश देण्यात आले. त्यांनी स्वत:हून राजीनाने द्यावेत, अशा सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)टोन्ड दुधाच्या गेटपासवर म्हशीचे दूध नेण्याच्या तक्रारीत तथ्य आहे. त्यामध्ये अद्याप कुणावर कारवाई केली नसली तरी कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. संघाने हे प्रकरण गंभीरपणे घेतले आहे.- डी. व्ही. घाणेकर,व्यवस्थापकीय संचालक गोकुळ दूध संघदरम्यान, आजच संबंधित वितरकाने ठेका रद्द करण्याच्या निर्णयास स्थगिती आणली आहे.