शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कारप्रकरणी एकास सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

By admin | Updated: November 16, 2014 00:51 IST

अवघ्या दहा महिन्यांत खटल्याचा निकाल

गडहिंग्लज : कचरा टाकायला घराबाहेर पडलेल्या वीस वर्षीय विवाहितेवर बलात्कार करून तिचे घर उद्ध्वस्त करण्याची धमकी दिल्याप्रकरणी राजू घुडुबास साबखान (वय ३८, रा. तेरणी, ता. गडहिंग्लज) यास येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. जगताप यांनी सात वर्षे सक्तमजुरी व तीन हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली. अवघ्या दहा महिन्यांत या खटल्याचा निकाल लागला. खटल्याची अधिक माहिती अशी, तेरणी येथील पीडित विवाहितेचा पती सातारा येथे हॉटेलमध्ये कामास आहे. ती सासू-सासऱ्यांसमवेत मोलमजुरी करत गावीच राहते. १८ जानेवारी २०१४ रोजी रात्री कचरा टाकण्यासाठी ती घराबाहेर पडली. त्यावेळी अंधारात दबा धरून बसलेल्या आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. बराचवेळ झाला तरी सून घरी न आल्यामुळे शोधाशोध करताना ती अंधारात निपचिप पडल्याचे सासूच्या निदर्शनास आले. त्यावेळी आरोपीही त्याच्या बाजूला उभा होता. ही घटना कोणास सांगितल्यास तुमचे सगळे घरच उद्ध्वस्त करीन, अशी धमकी त्याने सासू आणि पीडित महिलेला दिली होती. दुसऱ्या दिवशी सासूने गावातील पंच मंडळींना हा प्रकार सांगितला. त्यांनी चौकशीसाठी आरोपीला बोलावले. मात्र, तो गेला नाही. १५ मार्च २०१४ रोजी पीडित महिलेने पोलिसांत फिर्याद नोंदवली. सहा. फौजदार एस. एन. कुंभार यांनी चौकशीअंती आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. याकामी दहा साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी पीडित महिला व प्रत्यक्षदर्शी तिची सासू यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. सुनावनीअंती न्यायाधीश जगताप यांनी आरोपीस बलात्काराच्या गुन्ह्यासाठी सात वर्षे सक्तमजुरी, तीन हजार दंड व दंड न दिल्यास सहा महिने साधी कैद आणि धमकीच्या गुन्ह्यासाठी दोन महिने साधी कैद व एक हजाराचा दंड अशी शिक्षा ठोठावली. सरकारतर्फे अ‍ॅड. बी. के. देसाई यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)