कोल्हापूर जिल्हा बँकेच्या भोगावती शाखेत शॉर्टसर्किटने आग, महत्वाची कागदपत्रे जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 15:28 IST2026-01-06T15:25:19+5:302026-01-06T15:28:04+5:30
रोकडसह सोने सुरक्षित

कोल्हापूर जिल्हा बँकेच्या भोगावती शाखेत शॉर्टसर्किटने आग, महत्वाची कागदपत्रे जळून खाक
भोगावती : भोगावती (ता.करवीर) येथील जिल्हा बँकेच्या शाखेत मध्यरात्रीच्या सुमारास शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत संगणक, कॉन्टर, इलेक्ट्रीकल साहित्य, खुर्च्यासह महत्वाची कागदपत्रे जळुन खाक झाली आहेत. या आगीत प्राथमिक अंदाजानुसार सुमारे २५ लाखाहून अधिक नुकसान झाले आहे.
जिल्हा बँकेची भोगावती शाखा कारखान्याच्या समोर आहे. काल मध्यरात्री सव्वा दोनच्या सुमारास शाखेतून मोठ्याप्रमाणात धुर येऊ लागल्याचे कारखाना सुरक्षारक्षकांच्या निर्दशनास आले. त्यांनी तात्काळ आपल्या सहकाऱ्यांना बोलवून बँकेच्या इमारतीच्या दिशेने धाव घेतली. आत प्रत्यक्षात जाऊन पाहिले असता आग भडकत असल्याचे दिसून आले. क्षणाचा विलंब न लावता त्यांनी भोगावती कारखान्याच्या अग्निशामक दलाला पाचारण केले आणि आग विझविण्याचा प्रयत्न केला.
आगीत कॉन्टर, चार संगणक, नेट सिस्टम, इलेक्ट्रीकल साहित्य, कागदपत्रे जळून खाक झाली. सुदैवाने बँकेतील रोकडसह सोने सुरक्षित राहिले. जिल्हा बँकेचे संचालक राजेश पाटील-सडोलीकर यांनी या शाखेला भेट देऊन चौकशी केली.