शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागाच्या पथकास गवा सापडेना

By admin | Updated: February 27, 2015 00:21 IST

हेरवाडमधील गवा तेरवाडकडे : अपुऱ्या साहित्यामुळे ग्रामस्थामध्ये संताप

कुरुंदवाड : हेरवाड (ता. शिरोळ) येथील भरवस्तीत आलेल्या गव्याला पकडण्यात वनरक्षक पथकाला अपयश आले. रात्रभर पहारा ठेवूनही गवा दृष्टीस पडला नाही. मात्र, सकाळी गवा तेरवाड मार्गे परतला असल्याचा दावा या पथकाने केला आहे. त्यामुळे हेरवाडकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असला, तरी तेरवाड, कुरुंदवाड, शिरढोण ग्रामस्थांतून भीती व्यक्तकेली जात आहे. दरम्यान, गव्याला पकडून जंगलात सोडण्यासाठी आलेल्या पथकाकडे कोणतेही साधन नसल्याने ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.मंगळवारी येथील भरवस्तीत असलेल्या शेळके यांच्या ऊस शेतामध्ये गवा ग्रामस्थांच्या नजरेस पडल्याने ग्रामस्थांतून भीती व्यक्त होत होती. सामाजिक कार्यकर्ते बंडू पाटील यांनी गावात गवा आल्याची माहिती वनविभागाला कळविल्याने दुपारी वनपरिक्षेत्र अधिकारी ए. बी. निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल आर. बी. पताडे, आर. बी. मोरे, एम. एस. राऊत, एन. एस. नायकवडे, एस. डी. ढेरे यांचे पथक दाखल झाले. अंधार पडल्यानंतर गवा परतीसाठी बाहेर येतो त्यावेळी पकडणे अथवा हुसकावून लावण्यासाठी पथकाने रात्रीची मोहीम आखली. मात्र, मोहीम राबविण्यासाठी पथकाकडे कोणतेच साधन नाही. अखेर बंडू पाटील, बंडू बरगाले, प्रकाश पाटील, जयगोंडा पाटील, आदींनी बॅटरी, दोरी, आदी साहित्य उपलब्ध करून गव्याचा शोध घेण्यासाठी स्वत:च उतरले. त्यामुळे पथकाच्या उपयोग काय? असा सवाल उपस्थित करत ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे.गवा लपून बसलेल्या ऊस पिकाभोवती रात्रभर पहारा करण्यात आला. मात्र, गवा दृष्टीस न पडल्याने पथकाने सकाळी घोसरवाड, टाकळी, टाकळीवाडी, दत्तवाड भागात पाहणी केली. यावेळी तेरवाड येथे गव्याच्या पायाचे ठसे दिसल्याने गवा परतल्याचे पथकाने जाहीर केले. गवा पकडण्यासाठी आलेल्या पथकाला गवा दृष्टीसही न पडल्याने ग्रामस्थांतून आश्चर्य व्यक्त होत आहे. गव्याने जागा सोडल्याने हेरवाडकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असला तरी तेरवाड, शिरढोण, कुरुंदवाड ग्रामस्थांतून भीती व्यक्त होत आहे. (वार्ताहर)