शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

केएमटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी पर्यायांचा शोधक

By admin | Updated: August 24, 2014 00:48 IST

एक कोटी देणार

ोल्हापूर : प्रवाशांची सेवा करता-करता एक हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांच्या संसाराचा गाडा वाहणाऱ्या ‘केएमटी’ला सुरळीत मार्गावर आणण्याचे प्रयत्न पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी पातळीवर सुरू झाले आहेत. केएमटीचा रोजचा तोटा भरून काढून कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर कसे होतील, यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जाणार आहेत. दरम्यान, आज, शनिवारी संयुक्त बैठकीत कर्मचाऱ्यांचे पगार भागविण्यासाठी पर्यायांचा शोध घेण्यात आला; तथापि आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांच्या मान्यतेनंतरच त्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. केएमटीला दिवसागणिक सव्वादोन लाखांचा तोटा होत आहे. गेल्या काही महिन्यांतील हा संचित तोटा सहा कोटींच्या घरात जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे त्याची टाच थेट कर्मचाऱ्यांच्या पगारावर आली. दोन महिन्यांचे पगार थकले. तरीही कर्मचाऱ्यांनी काम सुरू ठेवले. परंतु केएमटीबाह्य व्यक्तींचे कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळत असल्याने कर्मचाऱ्यात अस्वस्थता झाली. त्याचा परिणाम कामकाजावर होत आहे.आज, शनिवारी दुपारी स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण, परिवहन सभापती वसंत कोगेकर, उपायुक्त अश्विनी वाघमळे, सहायक आयुक्त उमेश भोसले, केएमटीचे व्यवस्थापक संजय भोसले यांची संयुक्तपणे बैठक झाली. बैठकीत कर्मचाऱ्यांच्या पगारावर चर्चा झाली. सध्याची परिस्थिती पाहता पगार व डिझेलची उसनवारी भागविण्याकरिता महानगरपालिकेने एक कोटीचा निधी द्यावा किंवा तेवढे कर्ज घेणे या पर्यायांवर चर्चा झाली; परंतु आयुक्तांच्या मान्यतेशिवाय निर्णय घेणे अशक्य होते. (प्रतिनिधी)पूर्ण वेळ देणाऱ्या व्यवस्थापकाची गरज : पसारेकेएमटी प्रशासन व्यवस्थित चालविण्यासाठी केएमटीला सध्या पूर्ण वेळ व्यवस्थापकाची गरज आहे, असे परिवहन समितीचे माजी सभापती राजू पसारे यांनी म्हटले आहे. केएमटीची घडी नीट बसविण्याकरिता निष्काळजी अधिकाऱ्यांच्या प्रायोगिक तत्त्वावर बदल्या कराव्यात, असेही त्यांनी म्हटले आहे. याबाबत प्रसिद्धी पत्रकात पसारे यांनी म्हटले आहे की, केएमटीमध्ये २० एटीआय असून ते आपल्या कामाची जबाबदारी किती योग्य प्रकारे पार पाडतात, याची चौकशी झाली पाहिजे. कर्मचाऱ्यांची भरती व कायम करण्यासाठी पैसे घेणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी व्हावी. एक कोटी देणारके.एम. टी. कर्मचाऱ्यांचे पगार व अनुषंगिक देणी भागविण्यासाठी एक कोटी रुपयांची मदत महानगरपालिकेतर्फे देण्याचा निर्णय रात्री उशिरा आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतला. आशादायक चित्र ४गृहखात्याकडून अनुदान येणे रक्कम : चार कोटी.४शासनाकडून येणारे अनुदान लवकरच मिळण्याची शक्यता.४मंत्री भास्कर जाधव यांनी घोषित केलेले अनुदान येणे : २ कोटी. ४एक महिन्याचा पगार नंतर घेण्याची कर्मचाऱ्यांची तयारी. ४गृहखाते व मंत्री जाधव यांचे अनुदान आल्यास केएमटी पूर्वपदावर.विदारक चित्र४दररोजचा तोटा सरासरी २ लाख २५ हजार रुपये.४महिन्याचा सरासरी तोटा ६७ लाख ५० हजार रुपये.४दररोजचे उत्पन्न सरासरी ९ लाख रुपये.४महिन्याचे सरासरी उत्पन्न २ कोटी ७० लाख. ४कर्मचाऱ्यांचा महिन्याला पगार १ कोटी ५० लाख.४डिझेल, टायर व आनुषंगिक खर्च २ कोटी ५० लाख.४केएमटीबाह्य शक्तीचा हस्तक्षेप वाढला आहे.