अपंग-अव्यंग व्यक्तींच्या लग्नासाठी आर्थिक मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:26 IST2021-09-22T04:26:57+5:302021-09-22T04:26:57+5:30

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत जिल्ह्यातील अपंग-अव्यंग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी अर्थसहाय्य केले जाते. यंदाच्या आर्थिक ...

Financial assistance for marriage of persons with disabilities | अपंग-अव्यंग व्यक्तींच्या लग्नासाठी आर्थिक मदत

अपंग-अव्यंग व्यक्तींच्या लग्नासाठी आर्थिक मदत

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत जिल्ह्यातील अपंग-अव्यंग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी अर्थसहाय्य केले जाते. यंदाच्या आर्थिक वर्षासाठी जिल्ह्यातील जास्तीत-जास्त पात्र अपंग-अव्यंग व्यक्तींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी मंगळवारी केले आहे. या योजनेत किमान ४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या अपंग वधू किंवा वराने अपंगत्व नसलेल्या वधू किंवा वराशी विवाह केल्यास २५ हजार रुपयांचे बचत प्रमाणपत्र, २० हजार रुपये रोख, ४ हजार ५०० रुपयांचे संसारोपयोगी साहित्य खरेदीसाठी व ५०० रुपये स्वागत समारंभाच्या कार्यक्रमाचा खर्च असे ५० हजारांचे अर्थसहाय्य दिले जाते. विवाह झाल्यानंतर किमान एक वर्षाच्या आत या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे अर्ज करणे आवश्यक आहे. तरी नागरिकांची याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

---

Web Title: Financial assistance for marriage of persons with disabilities