शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

खुटाळवाडी येथील तरुणाची फिल्मी स्टाइलने आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बांबवडे : बांबवडे (ता. शाहूवाडी) येथे पोलीस चौकीच्या समोरील इमारतीवरून फिल्मी स्टाइलने दारूच्या नशेत आत्महत्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बांबवडे : बांबवडे (ता. शाहूवाडी) येथे पोलीस चौकीच्या समोरील इमारतीवरून फिल्मी स्टाइलने दारूच्या नशेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या गणेश यशवंत चव्हाण (२५), राहणार खुटाळवाडी (ता. शाहूवाडी) या तरुणास प्रसंगावधान राखून लोकांनी वाचवले; परंतु शेवटी गावी खुटाळवाडी येथे जाऊन त्याने आत्महत्या केली. या घटनेची नोंद शाहूवाडी पोलिसांत झाली आहे.

घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी दोनच्या सुमारास गणेश चव्हाण याने पोलीस चौकीच्या समोरील शेळके यांच्या इमारतीच्या गच्चीवरून उडी मारण्याचा प्रयत्न केला. हा फिल्मी थरार लोकांच्या लक्षात आला. त्यातील काही तरुणांनी लगेच इमारतीच्या गच्चीवर धाव घेत लोंबकळत असलेल्या गणेशला वाचविले. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी त्याला नातेवाइकांच्या स्वाधीन केले व तो आपल्या खुटाळवाडी या गावी गेला. तेथे साडेचारच्या सुमारास तळ्याशेजारील चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन गणेशने आत्महत्या केली. यावेळी तळ्याकडे जाणाऱ्या गणेशला वाचवण्यासाठी लोक त्याच्या पाठीमागून जात होते; परंतु तोपर्यंत त्याने आत्महत्या केली.

गणेश हा एकुलता एक असून तो अविवाहित आहे. त्याच्या पश्चात आई व एक विवाहित बहीण आहे. दारूच्या नशेत त्याने आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. पुढील तपास शाहूवाडी पोलीस करत आहेत.

फोटो २२बांबवडे तरुण

बांबवडे येथे फिल्मी स्टाइलने आत्महत्या करत असताना स्थानिकांनी गणेशला वाचविले होते.