शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
4
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
5
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
6
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
7
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
8
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
9
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
10
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
11
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
12
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
13
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
14
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
15
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
16
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
17
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
18
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
19
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
20
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
Daily Top 2Weekly Top 5

‘सर्किट बेंच’साठी चार दिवसांत फाईल

By admin | Updated: August 23, 2015 17:53 IST

संकलनाचे काम सुरू : कृती समितीचे निमंत्रक राजेंद्र चव्हाण यांची माहिती

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे ‘सर्किट बेंच’ सहा जिल्ह्णांसाठी कोल्हापूर येथे स्थापन करावे, या खंडपीठ कृती समितीच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर मुख्य न्यायाधीश शहा यांनी सहा जिल्ह्णांचे ठराव व संस्थानकाळातील कोल्हापुरातील खंडपीठाची माहिती मागविली आहे. ही माहिती गोळा करण्याचे काम सुरू असून येत्या चार दिवसांत माहितीची फाईल मुख्य न्यायाधीश शहा यांच्याकडे सादर केली जाईल, अशी माहिती कृती समितीचे निमंत्रक अ‍ॅड. राजेंद्र चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. कोल्हापुरात सर्किट बेंच व्हावे यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन सुरू आहे. यासंदर्भात शुक्रवारी (दि. २१) गोवा येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाच्या इमारतीमध्ये कृती समितीबरोबर मुख्य न्यायाधीश शहा यांची बैठक झाली. यावेळी कोल्हापूर कार्यक्षेत्रातील प्रलंबित खटले, प्रस्तावित सर्किट बेंचच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्णांचे कोल्हापूरपासून अंतर किती आहे, पक्षकारांना कोल्हापुरात येण्यासाठी कशा पद्धतीने सोय आहे याची माहिती घेतली. यावेळी अ‍ॅड. संभाजीराव मोहिते (कराड), श्रीकांत जाधव (सांगली), राजेंद्र चव्हाण, संतोष शहा, महादेवराव आडगुळे, माणिक मुळीक, प्रशांत चिटणीस, विवेक घाटगे आदींनी कोल्हापुरात सर्किट बेंच होण्यामागचे महत्त्व पटवून दिले होते. त्यानुसार शहा यांनी कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापन व्हावे, या मागणीचे सहा जिल्ह्णांच्या ठरावाच्या प्रती व संस्थानकाळातील खंडपीठाची माहिती मागविली. कृती समिती निमंत्रक अ‍ॅड. चव्हाण, सुस्मित कामत, मिलिंद जोशी, विजय ताटे, धनश्री चव्हाण आदी सदस्य माहिती एकत्रित करण्याचे काम करत आहेत. रमेश कुलकर्णी यांच्याकडून १९३१ च्या संस्थानकाळात कोल्हापुरात उच्च न्यायालय, सुप्रीम न्यायालय सुरू असल्याचे पुराव्याचे पुस्तक त्यांनी घेतले आहे. तसेच सहा जिल्ह्णांतील प्रत्येक तालुक्यांचे ठराव गोळा करण्याचे काम सुरू आहे. ही सर्व एकत्रित माहिती जमा करून चार दिवसांच्या आत शहा यांना सादर केली जाणार असल्याचे अ‍ॅड. चव्हाण यांनी सांगितले. (प्रतिनिधी) तीन तालुक्यांशी चर्चा करणार सोलापूर जिल्ह्णांतील अकरापैकी आठ तालुक्यांनी कोल्हापुरात ‘सर्किट बेंच’ स्थापन करण्याचे ठराव दिले आहेत परंतु सोलापूर शहर, अक्कलकोट व कर्माळा या तिन्ही तालुक्यांनी अद्याप ठराव दिलेले नाहीत. या तिन्ही तालुक्यांतील पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा करून ठराव मंजूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे अ‍ॅड. राजेंद्र चव्हाण यांनी सांगितले.