शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाशी लढताना - डॉ. मंजिरी घेवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:23 IST

हा आजार होऊच नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांना सुरुवात केली पाहिजे. वातावरणानुसार आहारात बदल आणि व्यायाम केलाच पाहिजे. कोरोनाचा ...

हा आजार होऊच नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांना सुरुवात केली पाहिजे. वातावरणानुसार आहारात बदल आणि व्यायाम केलाच पाहिजे. कोरोनाचा परिणाम श्वास आणि फुप्फुसावर होतो. त्यापासून वाचण्यासाठी भस्त्रिका, सुदर्शन क्रिया, दीर्घ श्वसन, प्राणायाम असे श्वासाचे व्यायाम केले पाहिजेत. वाफ घेताना पाण्यात घालण्यासाठी स्वेदनसारखे आयुर्वेदिक कीट वापरू शकता. निरगुंडीचा पाला आणि वेखंड घालून पाणी उकळत ठेवा आणि त्याची वाफ घ्या. हेच पाणी तुम्ही फरशी पुसण्यासाठी, दारात सडा मारण्यासाठी, तसेच वस्तू पुसण्यासाठी जंतुनाशक म्हणून वापरू शकता. वाफ घेताना दीर्घ श्वास घेऊन थोडा वेळ रोखून धरा. आयुर्वेदिक उपाययोजनांमध्ये नाकात अनुतेलसारखे औषधी ड्रॉप्स सोडले जातात. काहीच नसेल तर रोज सकाळ, संध्याकाळ गाईचे तूप इअर बड्समध्ये घालून नाकातून फिरवले तरी चालेल. हे झाले कोरोना होऊ नये म्हणून करायच्या उपाययोजना.

आता पाहूया कोरोना झाला तर काय करायचे. पहिली गोष्ट म्हणजे ॲलोपॅथी उपचार तातडीने सुरू करा. कारण हा आजार कमी वेळेत गंभीर रूप धारण करतो. मन शांत ठेवा, हालचालींवर नियंत्रण ठेवा. सूक्ष्म श्वसनाचे व्यायाम करा. कोरोनामुळे मानसिकतेवर मोठा परिणाम होताे. थकवा येतो. काही करू नये असे वाटणे, नैराश्य अशी अवस्था काही काळ येते. त्यातून बाहेर पडण्यासाठी शिरस्त पंचकर्म, पाद्यपूजा, नस्यविधी केला जातो. त्यामुळे थकवा कमी होतो. फुप्फुसाची कार्यक्षमता वाढते. उत्साह वाढतो. हर्मोनल बॅलन्स राहतो. विचारांची क्षमता वाढते. माणूस शांत आणि संतुलित होतो. या काळात अंघोळीच्या पाण्यात कडुलिंब आणि मोठं मीठ घातलं तरी ते विषाणूपासून आपलं संरक्षण करतात. कोरोनातून बरे झाल्यानंतर पुढील किमान महिनाभर आहार, विहार, व्यायाम आणि आपली कार्यक्षमता पूर्ववत करण्याच्या उपाययोजना अमलात आणल्या पाहिजेत. प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी आयुर्वेदाने काही प्रकारचे काढे सांगितले आहेत. हे काढे वैद्यांच्या सल्ल्याने योग्य प्रमाणात घ्या. कारण ते प्रत्येकाच्या प्रकृतीला मानवतीलच असे नाही. आरोग्यदायी आयुष्य जगायचे असो किंवा आजारांचा सामना करताना आयुर्वेद, पंचकर्म ही पारंपरिक संस्कृती मानवी जीवनासाठी अत्यंत उपयुक्त आहे.

--

डॉ. मंजिरी घेवारी (लेखिका आयुर्वेद व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)

फोटो नं : २१०४२०२१-कोल-मंजिरी घेवारी (कोरोनाशी लढताना)

--