फायटर्सची अंतिम फेरीत धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:12 IST2021-02-05T07:12:41+5:302021-02-05T07:12:41+5:30

कोल्हापूर : निखिल कदमच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर फायटर्स स्पोर्टस्‌ क्लबने शाहू स्पोर्टस्‌ अकॅडमीचा तब्बल १२१ धावांनी पराभव करीत स्पर्धेची ...

Fighters hit the final | फायटर्सची अंतिम फेरीत धडक

फायटर्सची अंतिम फेरीत धडक

कोल्हापूर : निखिल कदमच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर फायटर्स स्पोर्टस्‌ क्लबने शाहू स्पोर्टस्‌ अकॅडमीचा तब्बल १२१ धावांनी पराभव करीत स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.

राजाराम काॅलेज मैदानावर बुधवारी झालेल्या उपांत्य फेरीत प्रथम फलंदाजी करताना फायटर्स क्लबने ३८.३ षटकांत सर्वबाद २०९ धावा केल्या. यात निखिल कदमने ७६, तानाजी सलगरने ४३, सम्राट घोरपडेने १९, अर्षद पठाणने १४ धावा केल्या. शाहू स्पोर्टस्‌कडून तनय पुसाळकरने चार, मुद्दसर मुल्लाने तीन आणि विशाल पाटीलने दोन, प्रवीण गावडेने एक बळी घेतला.

उत्तरादाखल खेळताना शाहू स्पोर्टस् संघाला हे आव्हान पेलवले नाही. त्यांचा सर्व संघ ८८ धावांत गुंडाळला. यात शुभम वाडकरने १६, तनय पुसाळकरने १५ आणि मुद्दसर मुल्ला याने दहा धावा केल्या. फायटर्सकडून निखिल कदम, मंथन पाटील यांनी प्रत्येकी तीन, तर अर्षद पठाणने दोन व अभिजित लोखंडे, तुषार आसाेळे यांनी प्रत्येकी एक बळी घत विजयावर शिक्कामोर्तब केले.

Web Title: Fighters hit the final