पन्हाळ्यावर कोल्हापुरातील युवकांची मारामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:53 IST2021-02-05T06:53:46+5:302021-02-05T06:53:46+5:30

यातील अभिषेक अनिल भोसले याला मारण्यासाठी राहुल राजेंद्र काकरे (जुना बुधवार पेठ, कोल्हापूर) व वीरेन्द्र विलास भोसले (जुना ...

Fight of youth from Kolhapur on Panhala | पन्हाळ्यावर कोल्हापुरातील युवकांची मारामारी

पन्हाळ्यावर कोल्हापुरातील युवकांची मारामारी

यातील अभिषेक अनिल भोसले याला मारण्यासाठी राहुल राजेंद्र काकरे (जुना बुधवार पेठ, कोल्हापूर) व वीरेन्द्र विलास भोसले (जुना बुधवार पेठ, कोल्हापूर) यांनी चाकू व दगडांचा वापर करत ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद दाखल केली. राहुल राजेंद्र काकरे यांने अभिषेक अनिल भोसले (कुंभार गल्ली, पापाची तिकटी, कोल्हापूर), अमेय ढेरे (सोमवार पेठ, घिसाड गल्ली, कोल्हापूर) व ताहीर शेख (घिसाड गल्ली, कोल्हापूर) याने पूर्वीच्या भांडणाच्या कारणावरून अभिषेक अनिल भोसले, अमेय ढेरे, ताहीर शेख याने गाडी अडवून मनात राग धरून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने चाकूने हल्ला केला. तो काकरे यांनी चुकवला तसेच काकरेबरोबर त्याचे कुटुंबीय होते. त्यांना शिवीगाळ करून त्यांच्याबरोबर झटापट करून गळ्यातील चार तोळ्याची सोन्याची चेन ओढून घेतली व रमेश केकरे याला मारहाण केल्याबाबत परस्परांवर गुन्हा दाखल झाला.

Web Title: Fight of youth from Kolhapur on Panhala