Kolhapur News: प्रेमविवाहातून भादोलेत दोन गटात मारामारी, ९ जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 16:55 IST2023-04-20T16:55:30+5:302023-04-20T16:55:48+5:30

याप्रकरणी दोन्ही गटांतील १३ जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला

Fight between two groups in Bhadole Kolhapur over love marriage, 9 injured | Kolhapur News: प्रेमविवाहातून भादोलेत दोन गटात मारामारी, ९ जण जखमी

Kolhapur News: प्रेमविवाहातून भादोलेत दोन गटात मारामारी, ९ जण जखमी

पेठवडगाव : प्रेमविवाहावरून भादोले (ता. हातकणंगले) येथे दोन गटात मारामारीची घटना घडली. यामध्ये ९ जण जखमी झाले. मारहाणीत लोखंडी वस्तू, काठी, दगडाचा वापर करण्यात आला. याप्रकरणी दोन्ही गटांतील १३ जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. परस्परांवर दोन्ही फिर्यादी दाखल झाल्या आहेत. ही घटना मंगळवारी( दि.१८) घडली.

या मारहाणीत संजय विलास धनवडे, लक्ष्मी विलास धनवडे, प्रीती संजय धनवडे, विद्या संतोष धनवडे, मनीषा संजय धनवडे, छाया तानाजी धनवडे, पूजा अभिजीत कांबळे, शोभा शहाजी धनवडे, स्तुती शहाजी धनवडे (सर्व रा. भादोले ) अशी जखमींची नावे आहेत.

पोलिसांत मिळालेल्या माहितीनुसार भादोले येथील संतोष धनवडे यांनी कुरुंदवाड येथील विद्या सोनावळे यांच्याबरोबर २५ मार्च रोजी विवाह केला होता. विद्या या कुरुंदवाड पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती. पूजा करण्यासाठी हे नवदांपत्य भादोले येथे दहा दिवसांपासून राहत होते. दरम्यान, संतोष धनवडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भादोले येथील नातेवाइकाच्या मदतीने सोनावळे या मुलीचा शोध घेत संजय धनवडे यांच्या घरी आल्या. 

यावेळी सोनावळे यांनी फिर्यादी धनवडे यास शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. तर अन्य सोबतच्या नातेवाइकांपैकी काहींनी लोखंडी वस्तू, दगड, काठीने मारहाण करून जखमी केले. तसेच नववधू विद्या हिला जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सुजाता महावीर सोनावळे (रा. कुरुंदवाड), तुषार तानाजी धनवडे, शहाजी महादेव धनवडे, शोभा शहाजी धनवडे, शोभा तानाजी धनवडे (सर्व रा. भादोले), पूजा अभिजीत कांबळे (रा. कोरेगाव, ता. वाळवा) यांच्यावर गुन्हा नोंद झाला.

सुजाता सोनावळे यांनी दिलेल्या फिर्यादीत मुलगी विद्या यांची भेट घेण्यास विरोध केला. यावेळी धनवडे यांच्या नातेवाइकांनी मारहाण केली. या प्रकरणी संतोष संजय धनवडे, संजय विलास धनवडे, लक्ष्मी विलास धनवडे, मनीषा संजय धनवडे, प्रीती संजय धनवडे, ज्योती राहुल धनवडे यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.

Web Title: Fight between two groups in Bhadole Kolhapur over love marriage, 9 injured