शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाईचा भन्नाट जल्लोष

By admin | Updated: October 7, 2014 23:38 IST

कोल्हापुरात रंगला जिल्हास्तरीय युवा महोत्सव

कोल्हापूर : ठेका धरायला लावणारा लोकवाद्यवृंद, डोलविणारे लोकनृत्य, सामाजिक वास्तवाचे दर्शन घडविणाऱ्या लघुनाटिका, पथनाट्य तसेच ओसंडून वाहणारा उत्साह अशा भन्नाट वातावरणात आज, मंगळवारी ३४ व्या जिल्हास्तरीय युवा महोत्सवात दिवसभर तरुणाईने टेन्शन खल्लास असा जाम कल्ला केला. वादविवाद, एकांकिका, सुगम गायन, मूकनाट्य अशा सर्वच स्पर्धांमध्ये जिल्ह्यातील तरुणाईच्या कौशल्याचे दर्शन घडले. आपल्या संघाला, स्पर्धकाला टाळ्या, शिट्ट्यांनी ‘चिअर-अप’ करणाऱ्या युवक-युवतींनी वातावरणात रंग भरला. येथील राजाराम महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित या महोत्सवाला सुरुवात झाली. वादविवाद स्पर्धेत ‘हिंदी-चिनी भाईभाई : वास्तव की अभास’, ‘सोशल मीडिया’, आदी विषयांवर चांगलाच वाद रंगला. डॉ. बाळकृष्ण ग्रंथालय हॉलमधील लघुनाटिकेत २२ संघ सहभागी झाले. त्यांनी माळीण दुर्घटना, राजकारणाचे बदलते स्वरूप, व्यसनाधिनता आदी विषयांबाबत प्रबोधन केले. तबला, सूरपेटी, बासरीच्या साथीने सुगम गायनाची सूरमयी सफर घडली. त्यात प्रसाद पवार, प्रतिभा चौगुले, अभयकुमार पोतदार, स्नेहल पाटील, सोनाली जाधव, प्रियांका कदम, संकेत पोरे, पूजा पाटील आदींनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. दुपारी अडीचनंतर महोत्सवातील स्पर्धांचा वेग वाढला. खुला मंच येथील लोकवाद्यवृंदाद्वारे भारतीय पारंपरिक वाद्यांतून सादरीकरण करत आठ संघांनी उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थिनींना ठेका धरायला लावले. लोकनृत्यामध्ये लावणी, कोळीनृत्य, भांगडा आदींनी उपस्थितांना डोलविले. खुला मंचचा परिसर गर्दीने फुलला. वाद्यवृंद व लोकनृत्यास टाळ्या, शिट्ट्यांच्या गजरात दाद मिळत होती. यशवंतराव चव्हाण सभागृहात वीस संघांनी एकांकिका सादर केल्या.