शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

हद्दवाढीविरोधात गुरुवारपासून उपोषण

By admin | Updated: August 20, 2016 00:11 IST

कृती समितीच्या बैठकीत घोषणा : अठरा गावांतील ग्रामस्थ सहभागी होणार; दबावाला हक्काने उत्तर देऊ : नरके

कोल्हापूर : हद्दवाढविरोधात समर्थक व विरोधक यांच्यात आता आरपारची लढाई सुरू झाली आहे. यामध्ये अठरा गावांतील ग्रामस्थांचे गुरुवार(दि. २५)पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याची घोषणा सर्वपक्षीय हद्दवाढविरोधी कृती समितीने शुक्रवारी केली. समर्थकांकडून सरकारवर आणल्या जाणाऱ्या दबावाला न्याय्य हक्काने आंदोलनाच्या माध्यमातून योग्य उत्तर देऊ, असा इशारा यावेळी आमदार चंद्रदीप नरके यांनी दिला.शासकीय विश्रामगृह येथील राजर्षी शाहू सभागृहात सर्वपक्षीय हद्दवाढविरोधी कृती समितीची बैठक झाली. अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष संपतराव पवार-पाटील होते. यावेळी आमदार चंद्रदीप नरके, आमदार सुजित मिणचेकर, समितीचे प्रवक्ते नाथाजीराव पोवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, जिल्हा परिषदेचे सदस्य बाजीराव पाटील, अजित नरके, पै. संभाजी पाटील उपस्थित होते.गुरुवारपासून हद्दवाढ विरोधासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याची घोषणा बैठकीत करण्यात आली. याला अठरा गावांतील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सदस्य व ग्रामस्थांनी हात उंचावून पाठिंबा दिला.आमदार नरके म्हणाले, आता विकासाचे राजकारण बाजूला पडून दबावाचे राजकारण सुरू झाले आहे. काही ठरावीकच लोक हद्दवाढ होण्यासाठी उपोषणाचा घाट घालून सरकारवर दबाव आणत आहेत; परंतु त्यांचा दबाव तेथील जनतेचा नसून काही नेत्यांपुरताच मर्यादित आहे. याउलट आमची लढाई ही हक्कांसाठी असून, ती कोणावरही दबावासाठी नाही. दबावाला ग्रामीण भागातील जनता आपल्या हक्कांसाठी उपोषण करून योग्य उत्तर देईल.संपतराव पवार-पाटील म्हणाले, या आंदोलनामध्ये अठरा गावांतील ग्रामस्थ सहभागी होतील. हा एक ऐतिहासिक लढा असून, ग्रामीण जनतेच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. राज्य शासन आमच्या न्याय्य मागणीची दखल घेऊन हद्दवाढीची अधिसूचना काढणार नाही, असा विश्वास आहे.ढपलेवाल्यांना विचारणारेच कोणी नाही?ग्रामीण भागात एखादा अपहार झाल्याची चर्चा झाल्यास ग्रामसभेत याचा जाब विचारला जातो; पण शहरात भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे बाहेर येतात; त्यामुळे वृत्तपत्रांचे रकानेच्या रकाने भरतात; परंतु त्यांना जाब विचारणारे कोणीच नाही, अशी टीका समितीच्या एका कार्यकर्त्याने केली. शहराची गटारगंगा कोणी केली हे सर्वश्रुतग्रामीण भागातील नेत्यांमुळे शहराची गटारगंगा झाली, अशी वक्तव्ये हद्दवाढसमर्थक नेत्यांकडून केली जात आहेत. परंतु, ती नेमकी कुणामुळे झाली हे सर्वश्रुत आहे. ज्या ग्रामीण नेत्यांनी विश्वासाने पालिकेची सूत्रे ज्यांच्या हातात दिली, त्यांनीच ही गटारगंगा केली, असा टोला आमदार नरके यांनी नामोल्लेख टाळून महापालिका पदाधिकाऱ्यांना लगावला.आकसबुद्धीचे राजकारणनगरसेवकाला एखाद्या भागात मतदान मिळाले नसेल तर त्या भागातील कामे करायचीच नाहीत, असे अप्रत्यक्ष आदेशच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. एखाद्याने कामाविषयी संबंधित कर्मचाऱ्याला विचारल्यास त्या कर्मचाऱ्याकडून ‘संबंधित नगरसेवकाची परवानगी घ्या,’ असे उत्तर दिले जाते, ही परिस्थिती समितीच्या कार्यकर्त्याने यावेळी मांडली.