Kolhapur: शेतकऱ्यांना मिळणार ११.६९ कोटींची दुष्काळी मदत; हातकणंगले गडहिंग्लज तालुके दुष्काळग्रस्त जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2024 04:12 PM2024-03-16T16:12:37+5:302024-03-16T16:13:05+5:30

निविष्ठा खरेदीसाठी उपयोग 

Farmers will get 11.69 crore drought relief, Hatkanangle and Gadhinglaj taluka of Kolhapur district have been declared drought affected | Kolhapur: शेतकऱ्यांना मिळणार ११.६९ कोटींची दुष्काळी मदत; हातकणंगले गडहिंग्लज तालुके दुष्काळग्रस्त जाहीर

Kolhapur: शेतकऱ्यांना मिळणार ११.६९ कोटींची दुष्काळी मदत; हातकणंगले गडहिंग्लज तालुके दुष्काळग्रस्त जाहीर

आयुब मुल्ला

खोची: खरीप हंगामात पुरेसा पाऊस झाला नसल्याने पिकांच्या उत्पादनात ३३ टक्केपेक्षा जास्त घट झाली. नुकसानीचा अंदाज घेत शासनाने कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले व गडहिंग्लज हे दोन तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले. या तालुक्यातील इ पीक पाहणी नोंद केलेल्या शेतकऱ्यांनाच नुकसान भरपाई मिळणार आहे. त्यानुसार हातकणंगले तालुक्यासाठी ५ कोटी ७४ लाख ३९  तर गडहिंग्लज तालुक्यासाठी ५ कोटी ९५ लाख ४४ हजार रुपयांचे मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. लवकरच ही मदत शेतकऱ्यांना मिळेल.

खरीप हंगामात झालेल्या नुकसानीची दखल घेत राज्यात ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले व गडहिंग्लज या दोन तालुक्यांचा समावेश करण्यात  आला होता.खरीप हंगामात हातकणंगले तालुक्यात सरासरी च्या ९० टक्के तर गडहिंग्लज मध्ये ९८ टक्के पेरणी झाली होती.दोन्ही तालुक्यात अनुक्रमे २० व २८ हजार हेक्टर जिरायत क्षेत्र आहे.

परंतु ई पीक पाहणी नोंद न केलेल्या शेतकऱ्यांची संख्या जास्त असल्याने अनेक शेतकरी या कृषी विषयक मदतीपासून वंचीत राहणार आहेत.सुमारे तीस टक्के इतक्या पात्र शेतकऱ्यांनाच याचा लाभ मिळणार आहे.कृषी निविष्ठासाठीचे  अनुदान म्हणून राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून हेक्टरी ८हजार ५०० रुपया प्रमाणे ही मदतीची रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हातकणंगले तालुक्यात सोयाबीन,भुईमूग,तुर,मूग,उडीद अशा पिकांचे  निकषाप्रमाणे ६ हजार ५२५ हेक्टर क्षेत्र निश्चित झाले.त्यानुसार १७ हजार ३४४ शेतकऱ्यांना ५ कोटी ७४ लाख ३९ हजार रुपयांची मदत मिळणार आहे.तर गडहिंग्लज मध्ये ६ हजार ८६७ हेक्टर इतके क्षेत्र निश्चित होवून १६ हजार ७२० शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे.

निविष्ठा खरेदीसाठी उपयोग 

शेतकऱ्यांना मिळणाऱ्या  या मदतीतून कोणत्याही प्रकारची म्हणजे कर्जवसुली किंवा अन्य कोणतीही वळती करू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत.त्यामुळे निविष्ठा खरेदीसाठीच याचा उपयोग होईल.

Web Title: Farmers will get 11.69 crore drought relief, Hatkanangle and Gadhinglaj taluka of Kolhapur district have been declared drought affected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.