शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

शाहूवाडीतील शेतकरी देशोधडीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 00:25 IST

मलकापूर : शाहूवाडी तालुक्यातील शेतकºयांची पवनचक्की कंपनीच्या एजंटांनी नोटरीच्या नावाखाली हजारो एकर जमीन नाममात्र रुपयांत लिहून घेऊन मोठी फसवणूक केली आहे.

ठळक मुद्दे एजंटांकडून फसवणूक : कवडीमोल दराने जमिनींची विक्री; अनेक ठिकाणी परस्पर विकण्याचे प्रकार शेतकºयांच्या जमिनीचे नुकसान केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : शाहूवाडी तालुक्यातील शेतकºयांची पवनचक्की कंपनीच्या एजंटांनी नोटरीच्या नावाखाली हजारो एकर जमीन नाममात्र रुपयांत लिहून घेऊन मोठी फसवणूक केली आहे. तालुक्यातील शेतकरी तहसील कार्यालयाकडे हेलपाटे मारत आहेत. मात्र, परजिल्ह्यातील पवनचक्की कंपनीने महसूल कार्यालय, पोलीस ठाणे, निबंधक कार्यालय, भूमिअभिलेख कार्यालय, आदी कार्यालयांतील अधिकारी, कर्मचारी यांना हाताशी धरून सर्वसामान्य शेतकरी यांना देशोधडीला लावले आहे. गरीब शेतकºयांनी न्याय कुणाकडे मागायचा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

तालुक्याचे क्षेत्रफळ मोठे आहे. निसर्गाने तालुक्याला वनसंपत्ती, खनिज संपत्ती, वनौषधी, उंच हवेशीर टेकड्या, सपाट जमीन, दाट जंगल, धबधबे, आदी संपत्ती बहाल केली आहे. शिक्षणाच्या बाबतीत तालुका अजून मागास आहे. तर विकासापासून वंचित आहे. हजारो एकर जमीन पडीक आहे. यामध्ये डोंगर-टेकड्यांची संख्या मोठी आहे. गेल्या पाच वर्षांपूर्वी परजिल्ह्यातील पवनचक्की कंपनीने शाहूवाडी तालुक्यातील गावागावांत एजंट नेमून गरीब शेतकºयांना मोठ्या रकमेचे आमिष दाखवून नाममात्र पैशात वकिलाकडे नोटरी करून करोडो रुपये कमविले आहेत. एका नोटरीवर शेतकºयाला पाच ते पन्नास हजार रुपये रक्कम देऊन कंपनी व एजंटांनी कोट्यवधी रुपये कमविले आहेत. अशिक्षित शेतकºयाला फक्त रजिस्टर निबंधक कार्यालयात सहीसाठी बोलावले जाते. सही करून घेतल्यावर एजंट पुन्हा शेतकºयांची गाठ घेत नाहीत. शेतकºयांनी पैशाचा तगादा लावल्यावर पोलीस ठाण्याची गरीब शेतकºयाला भीती दाखविली जाते. त्यामुळे ‘भीक नको, कुत्रे आवर’ अशी शेतकºयांची अवस्था या एजंटांनी केली आहे.

करुंगळे, आळतूर, कडवे, पुसाळे, आळतूर धनगरवाडा, पुसाळे धनगरवाडा, अमेणी, जांबूर, पेरीड, शिरगाव गावातील शेतकºयांच्या जमिनी नाममात्र किमतीत खरेदी केल्या आहेत. सध्या कडवे, पेरीड, शिरगाव, अमेणी, आळतूर, पुसाळे, आदी गावांतील हद्दीत पवनचक्की प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. पवनचक्की एजंटांनी शासकीय अधिकाºयांना हाताशी धरून गरीब शेतकºयांच्या जमिनी लाटल्या आहेत. या जमिनी स्वस्त दरात मिळतात. यामुळे मुंबई, पुणे, सातारा, आदी जिल्ह्यांतील दोन नंबरचा पैसा मिळवणाºयांनी खरेदी केल्या आहेत. आॅनलाईन सातबारामुळे न विकलेल्या जमिनी एजंटांनी परस्पर नोटरी करून विकल्या आहेत. पवनचक्की कंपनीने स्वत: वीजवाहिनीचे विद्युत खांब शेतकºयांच्या बागाईत जमिनीत मनमानी करून उभे करून शेतकºयांच्या जमिनीचे नुकसान केले आहे.एजंट मालामालपवनचक्की एजंट कालपरवापर्यंत मोटारसायकलवरून फिरत होते. आता महागड्या चारचाकी गाड्यांतून फिरत आहेत. मात्र आपली जमीन कवडीमोल किमतीला एजंटांना विकल्याच्या काळजीत शेतकरी आहेत. एजंट चारचाकी महागडी गाडी, संध्याकाळी उंची दारू घशात रिजवत आहेत.साताºयात गुन्हा दाखल तालुक्यातील आंबा, तळवडे, मानोली, अमेणी, शिरगाव, धनगरवाडे, तुरुकवाडी, कोतोली, कडवे, गावडी, येळवणजुगाई येथील सर्वसामान्य, गरीब, अशिक्षित अशा अनेक शेतकºयांची फसवणूक झाली आहे. गरीब शेतकºयाला वाली कोण नाही. अशाच एका फसवणूक झालेल्या शेतकºयाने सातारा पोलीस ठाण्यात एजंटाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शाहूवाडी पोलीस ठाण्याकडे देखील तक्रारी दाखल झाल्या होत्या, मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. पवनचक्कीसाठी जमीन खरेदी-विक्री करणाºया एजंट, मालक, पवनचक्की कंपनी, तलाठी, रजिस्टर कार्यालयातील अधिकारी यांची चौकशी करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.