नरंदे येथील शेतकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:25 IST2021-05-18T04:25:23+5:302021-05-18T04:25:23+5:30

नरंदे, ता. हातकणंगले येथे सोमवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास शेताकडे जात असलेले शेतकरी रमजान इमाम मुल्लांनी (वय ६५) या ...

Farmers in Narande die of electric shock | नरंदे येथील शेतकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

नरंदे येथील शेतकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

नरंदे, ता. हातकणंगले येथे सोमवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास शेताकडे जात असलेले शेतकरी रमजान इमाम मुल्लांनी (वय ६५) या वृद्ध शेतकऱ्याचा वीज वितरण कंपनीच्या तुटलेल्या तारेला स्पर्श होऊन विजेचा शॉक बसून जागीच मृत्यू झाला. या घटनेची नोंद हातकणंगले पोलिस ठाण्यात झाली आहे

नरंदे येथील शेतकरी रमजान मुल्लानी सकाळी नऊच्या सुमारास शेतामध्ये जात होते. रस्त्यावर तुटून पडलेल्या मुख्य विद्युत तारेवर त्यांचा पाय पडून शॉक लागून मुल्लानी यांचा जागीच मृत्यू झाला. शेजारी असलेले शेतकरी अय्युब जमादार यांनी आरडाओरडा केला. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेची नोंद हातकणंगले पोलिस ठाण्यात झाली. असून हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

फोटो = रमजान इमाम मुल्लानी (नरंदे )

Web Title: Farmers in Narande die of electric shock