शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

भूसंपादनाविरोधात कोगनोळी परिसरातील शेतकरी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:26 IST

कोगनोळी : महामार्गाच्या सहापदरीकरणाव्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टीसाठी जमीन संपादित करू देणार नाही या मागणीवर कोगनोळी व परिसरातील शेतकरी आक्रमक ...

कोगनोळी : महामार्गाच्या सहापदरीकरणाव्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टीसाठी जमीन संपादित करू देणार नाही या मागणीवर कोगनोळी व परिसरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. महामार्ग व्यतिरिक्त इतर सर्व गोष्टींसाठी सुपीक जमिनी ऐवजी रिकाम्या जागांचाच वापर करावा, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू पवार केले.

यावेळी महामार्ग प्राधिकरणचे व्यवस्थापक एस. एम. नाईक यांनी कोगनोळीतून बाहेर जाण्यासाठी होणाऱ्या उड्डाणपुलासाठी जवळपास वीस एकर, तर सहापदरीकरणासाठी सात एकर इतकी जमीन संपादित करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेले निवेदन आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आल्याचेही सांगितले.

शासनाने राष्ट्रीय महामार्गांचे रुंदीकरण करण्यासाठी जमिनी संपादित करण्यास सुरुवात केली आहे. यासंदर्भातील नोटिसाही शेतकऱ्यांच्या हातात पडू लागल्या आहेत. परंतु, या रुंदीकरणाबरोबरच शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी संपादित करून या ठिकाणी खासगी तत्त्वावर आर्थिक उत्पन्नाचे स्रोत निर्माण होतील असे प्रकल्पही राबविले जाणार आहेत. छोट्या शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन असणाऱ्या सुपीक जमिनी संपादित करून मोठमोठ्या कंपन्यांच्या मार्फत उभारल्या जाणाऱ्या खासगी प्रकल्पांना विरोध करण्यासाठी शेतकरीवर्ग आक्रमक बनला आहे. यापूर्वीच चौपदरी महामार्गासाठी कवडीमोल दराने शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या आहेत. आता शेतकऱ्यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी थोड्या फारच जमिनी शिल्लक आहेत त्याही शासनाने संपादित केल्यास अन्नदात्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे.

यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते. त्यांना शेतकऱ्यांनी प्रश्न विचारून भंडावून सोडले. या ठिकाणी होत असलेल्या संपूर्ण प्रकल्पाची माहिती शेतकऱ्यांना दिली पाहिजे. त्यातून शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही याची हमी दिली पाहिजे. आजपर्यंत महामार्ग प्राधिकरण, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी यांना निवेदने देण्यात आली आहेत. त्यानुसार त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच प्रकल्पाचे पुढील कार्य करू दिले जाईल, असा इशाराही यावेळी शेतकऱ्यांनी दिला.यावेळी राजू पवार, बाळासाहेब हदीकर, संदीप चौगुले, पुंडलिक माळी यांच्यासह अनेक शेतकरी वर्ग तसेच महामार्ग प्राधिकरणाचे विठ्ठल मोरे, कमलेश आदी उपस्थित होते.

फोटो ओळ

महामार्ग रुंदीकरणाच्या भूसंपादनासाठी शेतकरी व प्राधिकरणाचे अधिकारी यांच्यात बैठक झाली.

( छाया : बाबासो हळिज्वाळे)