सातवेत उसाचा फड पेटवीत असताना शेतकऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:54 IST2021-02-05T06:54:21+5:302021-02-05T06:54:21+5:30

याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, मरगाळे यांच्या शेताशेजारी अन्य कोणाचाही ऊस नसल्याने ते शनिवारी दुपारी एकटेच तुटलेल्या उसाचा ...

Farmer dies while lighting sugarcane field | सातवेत उसाचा फड पेटवीत असताना शेतकऱ्याचा मृत्यू

सातवेत उसाचा फड पेटवीत असताना शेतकऱ्याचा मृत्यू

याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, मरगाळे यांच्या शेताशेजारी अन्य कोणाचाही ऊस नसल्याने ते शनिवारी दुपारी एकटेच तुटलेल्या उसाचा पाला पेटवीत होते. पाल्याला आग लागल्यानंतर ते मागे वळून येत असता त्याच्या पायात उसाचा खोडवा अडकल्याने ते खाली पडले. यावेळी त्यांच्या अंगाला आग लागली. याच वेळी रस्त्याने आमतेवाडी येथे खेळायला जात असलेल्या बच्चे सावार्डे येथील महादेव मोरे, अभिषेक बच्चे, आशितोष महाडिक, वैभव यादव या तरुणांना व त्यांच्यापाठोपाठ जात असलेले सावर्डेचे पोलीस पाटील सागर यादव यांनी मरगाळे यांना आगीतून बाहेर काढले. जास्त होरपळल्याने रुग्णालयात उपचार चालू असताना त्यांचा मृत्यू झाला.

Web Title: Farmer dies while lighting sugarcane field