शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

दुरावलेली वाघाटीची पिल्ली अखेर आईच्या कुशीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2020 10:24 AM

कसबा बावडा येथील उसाच्या शेतात आईपासून दुरावलेली दुर्मीळ वाघाटीची (वाईल्ड रस्टी स्पॉटेड कॅट) दोन पिल्ली अखेर आईच्या कुशीत विसावली. त्याच्या आईसोबत पुनर्भेटीचा वनविभागाचा प्रयोग यशस्वी झाला

ठळक मुद्देदुरावलेली वाघाटीची पिल्ली अखेर आईच्या कुशीतमायेची पुनर्भेट : वनविभागाच्या प्रयत्नांना यश

संदीप आडनाईककोल्हापूर : कसबा बावडा येथील उसाच्या शेतात आईपासून दुरावलेली दुर्मीळ वाघाटीची (वाईल्ड रस्टी स्पॉटेड कॅट) दोन पिल्ली अखेर आईच्या कुशीत विसावली. त्याच्या आईसोबत पुनर्भेटीचा वनविभागाचा प्रयोग यशस्वी झाला असला, तरी बघ्यांच्या गर्दीमुळे पहिल्या दिवशी दुसऱ्या पिलाची मात्र त्याच्या आईशी भेट झाली नव्हती. यासाठी वनविभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी संतोष वाळवेकर यांनी खूप प्रयत्न केले. आईसोबतचा हा मायेच्या पुनर्भेटीचा सोहळा वनविभागाच्या कॅमेऱ्यात बंद झाला आहे.कसबा बावडा येथील रमेश पाटील यांच्या उसाच्या शेतात ३० नोव्हेंबर रोजी आढळलेली वाघाटीची ही दोन पिल्ली बिबट्याची असल्याच्या अफवेमुळे काही उत्साही नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केली. यामुळे त्यांची आई या पिल्लांजवळ आली नाही. ही पिल्ली बिथरून जाऊ नयेत म्हणून बावडा रेस्क्यू फोरमच्या स्वयंसेवकांनी या पिलांना तातडीने वनविभागाच्या नियंत्रण कक्षाकडे सुपूर्द केले.वन्यजीव संक्रमण व उपचार केंद्राचे स्वयंसेवक ऋषिकेश मेस्त्री, अमित कुंभार, समर्थ हराळे, अनिल ढोले, सानिका सावंत, वंशिका कांबळे, अवधूत कुलकर्णी यांच्यासोबत वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अँड रिसर्च सोसायटी, बावडा रेस्क्यू फोरमचे स्वयंसेवक, कोल्हापूर वनविभागाचे उपवनसंरक्षक रावसाहेब काळे, करवीरचे वनक्षेत्रपाल सुधीर सोनावणे, फिरत्या पथकाचे वनक्षेत्रपाल युवराज पाटील, वनपाल विजय पाटील, वनरक्षक रुकेज मुल्लाणी गेले दोन दिवस या परिसरात ठिय्या मांडून होते.वाघाटीच्या या दोन पिलांचे अंदाजे वय १३ ते १७ दिवस असून, मादी पिलाने नुकतेच डोळे उघडले होते; तर नर पिलाचे डोळे अद्यापही उघडलेले नव्हते. डॉ. विद्या पाटील यांनी भेट दिलेल्या इन्टेसिव्ह केअर वॉर्मरद्वारे डॉ. वाळवेकर यांनी या दोन्ही पिलांना आईची कृत्रिम ऊब दिली.

आईच्या दुधावर अवलंबून असणाऱ्या या पिलांची लवकरात लवकर आईसोबत पुनर्भेट व्हावी म्हणून वरिष्ठ वन अधिकाऱ्यांंशी चर्चा केली. त्यानुसार त्याच दिवशी सायंकाळी त्याच ठिकाणी पुनर्भेटीसाठी या दोन्ही पिलांना सुरक्षितरीत्या ठेवले. ही प्रक्रिया नोंद करण्यासाठी कॅमेरा ट्रॅप लावल्याची माहिती डॉ. संतोष वाळवेकर यांनी दिली आहे.पिलांच्या हाकेला आईचा प्रतिसादएका पिलाने आईला आवाज देणे सुरू केले; परंतु दिवसभरातील गर्दीमुळे घाबरलेल्या वाघाटीने पिलांना प्रतिसाद दिला नव्हता. दोन ते तीन वेळा जागा बदलल्यानंतर १ डिसेंबर २०२० रोजी पहाटे ०५.४९ वाजण्याच्या सुमारास पिलांच्या हाकेला प्रतिसाद देत दबकत-दबकत येऊन मादी पिलास आई घेऊन गेली. मात्र, घाबरल्यामुळे ती दुसऱ्या पिलास घेऊन गेली नाही. मात्र २ डिसेंबरच्या रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास या दुसऱ्या पिलासही आईने सोबत नेले. आईसोबतच्या या मायेच्या पुनर्भेटीसाठी वनविभागाने केलेल्या प्रयत्नाचे कौतुक होत आहे. 

टॅग्स :environmentपर्यावरणwildlifeवन्यजीवforest departmentवनविभागkolhapurकोल्हापूर