प्रसिद्ध सराफ व्यावसायिक प्रभाकर गाडगीळ यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:29 IST2021-09-10T04:29:56+5:302021-09-10T04:29:56+5:30

कोल्हापूर : महाराष्ट्रातील अग्रगण्य असलेल्या पुरुषोत्तम नारायण गाडगीळ (पीएनजी) या सराफ पेढीचे ज्येष्ठ संचालक प्रभाकर शंकर उर्फ अरुणदादा गाडगीळ ...

Famous goldsmith Prabhakar Gadgil passed away | प्रसिद्ध सराफ व्यावसायिक प्रभाकर गाडगीळ यांचे निधन

प्रसिद्ध सराफ व्यावसायिक प्रभाकर गाडगीळ यांचे निधन

कोल्हापूर : महाराष्ट्रातील अग्रगण्य असलेल्या पुरुषोत्तम नारायण गाडगीळ (पीएनजी) या सराफ पेढीचे ज्येष्ठ संचालक प्रभाकर शंकर उर्फ अरुणदादा गाडगीळ (वय ८२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे.

अरुणदादा हे सुरुवातीला ते पूर्णवेळ सराफी पेढीचे काम पाहत असत. त्यांना शेतीमध्ये आवड असल्याने जवळ जवळ ५० वर्षे त्यांनी मिरज तालुक्यातील सलगरे येथे शेती केली. शेतीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्याकडे त्यांचा कल होता. त्यांचा स्वभाव शांत, मनमिळाऊ होता. सांगली ब्रिज असोसिएशनचे ते अध्यक्ष होते. सांगली रोटरीचे सदस्य होते. त्यांचा अनेक सामाजिक कामात हिरीरीने सहभाग असायचा. त्यांच्या निधनाने सराफी ,शेती व सामाजिक क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे. पेढीचे संचालक राजीव व समीर गाडगीळ यांचे वडील होत. रक्षाविसर्जन रविवारी (दि.१२) सकाळी दहा वाजता सांगली येथे आहे.

फोटो : ०९०९२०२१-कोल-प्रभाकर गाडगीळ (निधन)

Web Title: Famous goldsmith Prabhakar Gadgil passed away