शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

चंदगड तालुक्यात महाविकास आघाडीत बिघाडी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:30 IST

चंदगड : राज्यात महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली ...

चंदगड : राज्यात महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली असून तालुक्यातील काँग्रेस, भाजप, शिवसेनेने मात्र अजून आपली भूमिका स्पष्ट करत नाहीत. त्यामुळे आघाडीत बिघाडी होणार काय? असा संशय कार्यकर्त्यांतून व्यक्त केला जात आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार आहे. आघाडीत ठरल्याप्रमाणे यापुढील सर्वच निवडणुका भाजपला शह देण्यासाठी महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली लढण्याचे ठरले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसने तालुक्यात आढावा बैठक घेऊन आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे रणशिंग फुंकले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होण्याचा संशय बळावला आहे.

राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीतील घटक पक्ष वरिष्ठ पातळीवर गुण्यागोविंदाने नांदत असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, त्याउलट परिस्थिती तालुक्यात पहावयास मिळत आहे. मुख्य प्रतिस्पर्धी भाजपाला सोडून एकमेकांचे पाय ओढण्याची संधी तिन्ही पक्ष सोडत नसल्याचेही दिसत आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजप, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस अशी चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांना संधी मिळणार आहे. त्याचा फायदा उठविण्यात कोण यशस्वी होणार त्याच्याच गळ्यात विजयाची माळ पडणार आहे.

प्रतिक्रिया

आगामी जि. प. व पं. समिती निवडणुकीची तयारी जोरात सुरू असून गणपती विसर्जनानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची भूमिका घेऊन लोकांसमोर जाणार आहे.

- नामदेव पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष

प्रतिक्रिया

पक्षाचा आदेश आल्यास आम्हीही स्वबळावर आगामी निवडणुका लढवू. याबाबत गणेशोत्सव काळात काँग्रेसचा मेळावा घेणार असून त्यामध्ये पक्षाची अधिकृत भूमिका जाहीर करणार आहे.

संभाजीराव शिरोलीकर, तालुका काँग्रेस अध्यक्ष

प्रतिक्रिया

गेल्या जि. प. व पं. समिती निवडणुकीत कोणतेही पाठबळ नसताना थोडक्याच मतांनी आमचे उमेदवार पराभूत झाले होते. आता तर राज्यात शिवसेनेचे सरकार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आदेश आल्यास स्वबळावर लढण्यास आम्हीही तयार आहोत.

संग्राम कुपेकर, शिवसेना चंदगड विधानसभा संघटक