शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरसह १४ शहरांना जादा एफएसआय

By admin | Updated: November 20, 2015 00:56 IST

एकच विकास नियंत्रण नियमावली : शेतजमिनीवर होणार बांधकामे; औद्योगिक क्षेत्रात निवासी बांधकामांना मान्यता

यदु जोशी -- मुंबई--राज्यातील १४ ‘ड’ वर्ग महापालिकांसाठी एकच विकास नियंत्रण नियमावली (डीसी रुल्स) तयार करण्यात आली असून, चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) वाढविण्यात आला आहे. आतापर्यंत मूळ एफएसआय एक इतका होता, आता तो १.३० इतका राहील. औद्योगिक क्षेत्रात निवासी बांधकामे करण्यास अनुमती देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या नियमावलीला मंजुरी दिली. या महापालिकांमध्ये कोल्हापूर, सोलापूर, सांगली-मिरज-कुपवाड, चंद्रपूर, अमरावती, अकोला, नांदेड-वाघाळा, औरंगाबाद, परभणी, लातूर, जळगाव, अहमदनगर, धुळे आणि मालेगाव महापालिकेचा समावेश आहे. यातील औरंगाबाद ही आता ‘क’ वर्ग महापालिका असली, तरी सर्व १४ महापालिकांसाठी एकच विकास नियंत्रण नियमावली तयार करण्यासाठी समितीची स्थापना २०१२ मध्ये झाली तेव्हा औरंगाबाद ही ‘ड’ वर्ग महापालिकाच होती. या सर्व महापालिकांमध्ये आता हस्तांतरणीय विकास शुल्क (टीडीआर) दिला जाणार आहे. समान नियमावलीबाबतची अधिसूचना नगरविकास विभागाचे अवर सचिव संजय सावजी यांनी गुरुवारी निर्गमित केली. त्यावर आता एक महिन्याच्या आत हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत. शैक्षणिक, वैद्यकीय, आयटी, बायोटेक्नॉलॉजी पार्क, धार्मिक स्थळे, स्टार हॉटेल्स यांच्या उभारणीसाठी अधिमूल्य (प्रीमियम) आकारून वाढीव चटई निर्देशांक (एफएसआय) देण्यात येणार आहे.असा मिळणार टीडीआरनऊ मीटरपेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यांलगत टीडीआर दिला जाणार नाही. ९ ते १२ मीटर रस्त्यालगत एक हजार चौरस मीटरच्या भूखंडावर ०.२० इतका टीडीआर दिला जाईल. एक हजार ते चार हजार चौरस मीटरच्या भूखंडावर ०.४० इतका टीडीआर मिळेल. चार हजार चौरस मीटरपेक्षा जास्तीच्या भूखंडावर ०.४० इतका टीडीआर मिळेल. १२ ते १८ मीटर रुंदीच्या रस्त्यालगत अनुक्रमे ०.३०, ०.५० आणि ०.६५ इतका टीडीआर मिळेल. १८ ते २४ मीटरच्या रस्त्यालगत अनुक्रमे ०.३०, ०.६० आणि ०.९० इतका टीडीआर मिळेल. २४ ते ३० मीटरच्या रस्त्यालगत हा टीडीआर अनुक्रमे ०.३०, ०.८० आणि १.१५ इतका दिला जाईल. ३० मीटर आणि त्यापेक्षा जास्त रुंदीच्या रस्त्यालगत अनुक्रमे ०.३०, १.०० आणि १.४० इतका टीडीआर दिला जाईल. जादा एफएसआय आणि टीडीआरची सवलत ही निवासी आणि व्यावसायिक बांधकामांसाठी असेल.शेतीचा बिगरशेती वापरशेतजमिनीचा वापर शैक्षणिक, वैद्यकीय, आयटी, बायोटेक्नॉलॉजी पार्क, पेट्रोल पंप, अ‍ॅम्युझमेंट पार्क, प्रशिक्षण केंद्रांच्या उभारणीसाठी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. विशेष नगर योजना, हेरिटेज इमारती, म्हाडाच्या इमारतींची पुनर्बांधणी, उत्पन्न गटाच्या सदनिका, पर्यावरणपूरक इमारती, रेनवॉटर हार्वेस्टिंग आणि सोलर वॉटर हिटिंग सिस्टीमची उभारणी करण्यासंदर्भात नियमावली निश्चित करण्यात आल्या आहेत. औद्योगिक क्षेत्रातही घरेऔद्योगिक क्षेत्रामध्ये रहिवासी आणि वाणिज्यिक वापराला अनुमती देण्यात आली आहे. एकूण उपलब्ध एफएसआयच्या २५ टक्के एफएसआय हा त्यासाठी वापरता येईल. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रांमध्ये आता निवासी बांधकामे मोठ्या प्रमाणात होणार आहेत. प्रीमियमवर जादा एफएसआयरस्त्याच्या रुंदीनुसार जादा एफएसआय देण्यात येणार आहे. त्यात नऊ मीटर रुंदीच्या रस्त्यालगत असलेल्या बांधकामांसाठी १.३० इतकाच एफएसआय असेल. ९ ते १२ मीटर, १२ ते १८ मीटर, १८ ते २४ मीटर, २४ ते ३० मीटर आणि ३० मीटरपेक्षा जास्त रुंदीच्या रस्त्यालगत असलेल्या बांधकामांना १.३० इतका मूळ एफएसआय दिला जाईल आणि प्रीमियम भरून ०.३० इतका एफएसआय घेता येईल. तसेच, किती रुंदीच्या रस्त्यालगतच्या बांधकामासाठी किती टीडीआर दिला जाईल, हेही निश्चित करण्यात आले आहे.