शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

एक्झॉस्ट फॅनपासून सिक्युरिटीपर्यंत

By admin | Updated: December 16, 2014 23:59 IST

४० वे शहरस्तरीय प्रदर्शन : बालवैज्ञानिकांच्या संशोधनाचा आविष्कार

कोल्हापूर : जिल्हा परिषद शिक्षण विभाग, शहर विज्ञान समिती आणि नेहरू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज यांच्यातर्फे ४० व्या शहरस्तरीय विज्ञान प्रदर्शनाला मुस्लिम बोर्डिंग येथील नेहरू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये आज, मंगळवारी प्रारंभ झाला. चिरंतन विश्वासाठी गणित आणि विज्ञान या संकल्पना हा प्रदर्शनाचा मुख्य विषय असून, या प्रदर्शनाचे उद्घाटन कोल्हापूर एस़एस़ सी़ बोर्डाचे विभागीय सचिव शरद गोसावी व जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी मुस्लिम बोर्डिंगचे अध्यक्ष गणी आजरेकर होते. या प्रदर्शनात जैविक आणि अजैविक वस्तूंचा पुनर्वापर करून तयार करण्यात येणाऱ्या विविध वस्तू, एक्झॉस्ट फॅनद्वारे तेलाच्या डब्याचा एसीसारखा वापर, फौंड्री आणि कारखान्यातील राख, चुना, वाळू आणि पाण्यापासून तयार केलेल्या विटा, बिसलरीच्या कॅपपासून तयार केलेले घड्याळ आणि प्लास्टिकच्या वस्तूपासून तयार केलेल्या विविध वस्तू, कायनेटिक ऊर्जेद्वारे शेतीसाठी पाणी खेचणारे मशीन, वायरलेस रोबोट ही प्रदर्शनाची वैशिष्ट्ये आहेत.वीजचोरीची माहिती वीज उपकेंद्राला देणारी कंट्रोल रूम, कचरा वर्गीकरणाचे मॉडेल, औद्योगिक वसाहतीमधून येणाऱ्या सांडपाण्याचा बागेसाठी वापर, पर्यावरणपूरक घोषणा आणि चोरीला आळा घालण्यासाठी तयार भिंतींवर बसवण्यात येणाऱ्या डिजिटल सायरनची मॉडेल बालवैज्ञानिकांच्या कल्पनाशक्तीची आणि पर्यावरणभानाची अनुभूतीच देत आहेत. हे प्रदर्शन गुरुवार (दि. १८) पर्यंत सुरू राहणार आहे. प्रमुख पाहुणे शरद गोसावी यांनी, विज्ञान प्रदर्शने ही केवळ प्रतिकृती उभारणारी नसावीत. या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांच्या संशोधक वृत्तीला चालना मिळाली पाहिजे, भावी संशोधक घडले पाहिजेत, छोट्या-छोट्या निरीक्षणातून विज्ञाननिष्ठेला वाव देणे शक्य आहे, असे मत व्यक्त केले. उद्घाटन समारंभास मुख्याध्यापक संघाचे सचिव आर. वाय. पाटील, टी. एल. मोळे, आर. व्ही. कांबळे, कादर मलबारी, अमिर शिंदी, हाजी मुजावर उपस्थित होते.