शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: एसआयटी नेमली तरी बेपत्ता माजी सरपंच पिळणकर यांच्या तपासाला गती येईना, पुरावे नष्ट होण्याचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 13:06 IST

सव्वादोन महिन्यांनी पुन्हा तपास

कोल्हापूर : भुदरगड तालुक्यातील पाटगावचे बेपत्ता माजी सरपंच महेश पिळणकर यांचा शोध घेण्यासाठी पोलिस अधीक्षकांनी एसआयटी तयार करून आठवडा उलटला. अजूनही पिळणकर यांच्या तपासाला गती आलेली नाही. एसआयटी प्रमुखांकडून आधीच्या तपासाचा आढावा घेणे सुरू आहे. पिळणकर बेपत्ता होऊन सव्वादोन महिने उलटले आहेत. आणखी विलंब झाल्यास पुरावे नष्ट होण्याचा धोका त्यांच्या कुटुंबीयांकडून व्यक्त केला जात आहे.माजी सरपंच पिळणकर हे ७ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी त्यांच्या घरातून बाहेर पडले होते. गावापासून काही अंतरावर जंगलात त्यांची दुचाकी गावकऱ्यांना आढळली. मात्र, त्यांचा मोबाइल मिळाला नाही. झटापट झाल्याचे काही पुरावे परिसरात मिळाले नाहीत. जंगली श्वापदांचा हल्ला झाल्याचाही मागमूस नाही. पोलिसांनी गोळा केलेल्या पुराव्यांमधूनही काही ठोस हाती लागले नाही. त्यामुळे महेश पिळणकरांचे नेमके काय झाले? असा सवाल उपस्थित केला जात आहे.एसआयटीकडून तपास गतिमान होईल, असा विश्वास पोलिस अधीक्षकांनी व्यक्त केला आहे. मात्र, पहिला आठवडा केवळ आधीच्या तपासाचा आढावा घेण्यात गेला. गडहिंग्लज उपविभागाचे उपअधीक्षक रामदास इंगवले यांनी भुदरगड पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाकडून गेल्या दोन महिन्यांतील तपासाचा आढावा घेतला.घटनास्थळाचे पंचनामे, नातेवाइक, साक्षीदारांचे जबाब, जंगलात मिळालेली राख आणि काही अवशेषांचे फॉरेन्सिक अहवाल, पिळणकर यांच्या कॉल डिटेल्सची माहिती इंगवले यांनी घेतली आहे. मिळालेल्या माहितीची पडताळणी सुरू असून, लवकरच तपासाला गती येईल, असे उपअधीक्षक इंगवले यांनी सांगितले.सव्वादोन महिन्यांनी पुन्हा तपासपिळणकर बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल होताच भुदरगड पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पाटगावच्या जंगलात आठवडाभर तळ ठोकला होता. पिळणकर यांच्या संपर्कातील काही व्यक्तींकडे चौकशी केली. काही संशयित व्यक्तींवर पाळत ठेवली. पाच ते सात जानेवारी दरम्यान त्यांच्या मोबाइलवर कॉल केलेल्या व्यक्तींना बोलावून बोलावून चौकशी केली. तरीही पोलिसांच्या हाती काही लागले नाही. आता दोन महिन्यांनी पुन्हा तपासाला सुरुवात झाली आहे.पुरावे सांभाळापोलिसांनी जंगलातून गोळा केलेली राख आणि एक दात तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबकडे दिला होता. मात्र, त्याचा अहवाल अस्पष्ट आला. दुसऱ्या लॅबमध्ये पुनर्तपासणी करण्यासाठी मुद्देमालाची मागणी पोलिसांनी केली आहे. मात्र, त्याला अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. पोलिसांनी तातडीने तपास करावा आणि पुरावे सांभाळून ठेवावेत, अशी मागणी पिळणकर यांच्या नातेवाइकांनी केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Missing ex-Sarpanch Pilankar case: SIT investigation stalls, evidence at risk.

Web Summary : Weeks after forming an SIT, the search for missing ex-Sarpanch Mahesh Pilankar stalls. Key evidence may be lost as the investigation lags two months after his disappearance near Patgaon. Family urges swift action to preserve crucial evidence.