थकीत पगारामुळे कर्मचार्‍यांची उपासमार

By Admin | Updated: May 22, 2014 01:14 IST2014-05-22T01:13:33+5:302014-05-22T01:14:55+5:30

‘के.एम.टी.’ची स्थिती : ३० बसेस थांबविण्याची नामुष्की

Employee's starvation due to tired salaries | थकीत पगारामुळे कर्मचार्‍यांची उपासमार

थकीत पगारामुळे कर्मचार्‍यांची उपासमार

 कोल्हापूर : कोल्हापूर म्युनिसिपल ट्रान्सपोर्टच्या(के.एम.टी.) रोजंदारी कर्मचार्‍यांचे पगार गेली दोन महिने थकले आहेत. परिणामी अनेक कर्मचार्‍यांनी आज (बुधवार) के.एम.टी.कडे पाठ फिरविण्यास सुरुवात केली आहे. परिणामी चालक-वाहकांअभावी के.एम.टी.च्या बसेस थांबून आहेत. दररोज सव्वा दोन लाखांचा तोटा घेऊन प्रवास करणार्‍या के.एम.टी.समोरील आव्हान दिवसें-दिवस वाढतच आहेत. कोणताही ठोस कार्यक्रम व्यवस्थापनाच्या हाती नसल्याने के.एम.टी.चे दुखणे वाढतच आहे. गेल्या वर्षभरात उत्पन्नवाढीसाठी बैठका व पोलिसांना अवैध वाहतूक रोखण्यासाठी केलेला पत्रव्यवहार वगळता व्यवस्थापनाला काहीही करता आलेले नाही. दुसरीकडे पगार थकल्याने कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ आली आहे. ८५० कुटुंबांची आर्थिक कुचंबणा होत आहे. कर्मचार्‍यांनी आता के.एम.टी.कडे पाठ फिरविण्यास सुरुवात केली आहे. कर्मचारी नसल्याने बसेस थांबवून ठेवण्याची नामुष्की व्यवस्थापनावर आली आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Employee's starvation due to tired salaries