शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

थंब यंत्रणेला कर्मचाऱ्यांचा ठेंगाच

By admin | Updated: August 18, 2014 21:35 IST

पेठवडगाव नगरपालिका : मशिनची जोडणी होऊन सुद्धा अंमलबजावणी नाही

पेठवडगाव : जिल्ह्यात वडगाव नगरपालिकेने अनुक्रमाने सुमारे दोन वर्षांपूर्वी थंब मशिन बसविले होते. यामुळे कर्मचाऱ्यांच्या कामात पारदर्शकता यावी यासाठी प्रशासनाने महत्वकांशी प्रकल्प राबविला होता. परंतु, या मशिनची जोडणी होऊन सुद्धा अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे कामचुकार कर्मचाऱ्यांची नेहमी प्रमाणे चंगळच सुरु आहे. हे कर्मचारी थंब पंच न करता उलटा ठेंगाच दाखवत असल्याची नागरिकांच्यातून चर्चा आहे.वडगाव नगरपालिकेस शतकोत्तर रौप्यमहोत्सवी परंपरा आहे. पूर्वापार नोकरीसाठी राजकीय आशीवार्द असतो. त्यामुळे काही ठराविक कर्मचारी ‘आवो-जावो, घर तुम्हारा’ न्यायाने वागतात. तर काहीजण महिनोमहिने गायब असतात. काहीजण नेमके सही करण्याच्या वेळेत हजर राहून दांडी मारतात. अशा ठराविक कर्मचाऱ्यांच्या प्रवृत्तीमुळे पालिकेच्या प्रशासनाची बदनामी होत आहे. तर याचा फटका काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बसतो. त्यांच्यावर कामाचा ताण येत असतो.यावर रामबाण तोडगा निघावा, आधुनिकतेचा स्वीकार करणाऱ्या मोजक्या नगरपालिकेप्रमाणे वडगाव पालिकेने धोरण स्वीकारले, कोल्हापूरच्या एम. जे. मल्टी सर्व्हिसेस १९ हजारात वर्षभर सेवा या तत्वावर बायोमेट्रिक टाईम फिंगर प्रिंट मशीन बसविले. कर्मचाऱ्यांचा दररोजचा साप्ताहिक अहवाल प्रशासनास मिळणार होता. त्यामुळे कामचुकार कर्मचाऱ्यांना याचा फटका बसणार होता. ही यंत्रणा सुरूच होवू नये यासाठी काहींनी प्रयत्न केल्याचा संशय आहे. त्यामुळे मशिन सुरू आहे, यंत्रणा मात्र बंद आहे. अशी परिस्थिती आहे.नगराध्यक्षा विद्या पोळ यांनी कर्मचाऱ्यांना शिस्त व कामाचे महत्व पटविण्यासाठी प्रबोधन के. तसेच काही कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड सक्ती लागू केली. त्यामुळे कामचुकार कर्मचाऱ्यांवर काही अंशी लगाम बसण्यास मदत झालेली आहे. दरम्यान या प्रश्नी पालिका सभेत ही प्रश्न उपस्थित झाला. थंब मशिन व सि. सी. टी कॅमेरे बसवावे अशी चर्चा झाली होती. मात्र सध्या तरी आहे ते थंब मशिन वापरावे अशी मागणी नागरिकांच्यातून होत आहे. (प्रतिनिधी)