शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

आमदारकीचा पगार जनतेच्या विम्यासाठी

By admin | Updated: July 7, 2015 21:10 IST

हसन मुश्रीफ : कागल येथे पंतप्रधान विमा योजनेचा धनादेश प्रदान

कागल : पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेमुळे अपघाती मृत्यू, जायबंदी झाल्यानंतर विमा रकमेचे संरक्षण मिळणार आहे. ग्रामीण भागातील लोकांना याचा लाभ मिळावा म्हणून मी माझा आमदारकीचा सर्व पगार जनतेचा विमा उतरविण्यासाठी खर्च करणार आहे, असे उद्गार आमदार हसन मुश्रीफ यांनी काढले.बापूसाहेब महाराज चौकात आयोजित योजनेच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. कागल विधानसभा मतदारसंघातील संजय गांधी निराधार योजनेतील सर्व लाभार्थी आणि इतर गरजू लोकांचा प्रत्येकी १२ रुपयेप्रमाणे एक लाख लोकांचा विमा स्वत: उतरविण्याचा संकल्प त्यांनी जाहीर केला होता. त्याचा प्रारंभ सोमवारी करण्यातआला. आय. सी. आय. सी. सी. बँकेचे कांचन कुलकर्णी यांच्याकडे धनादेश प्रदान केला.मुश्रीफ म्हणाले की, मला दरमहा आमदारकीचा एक लाख रुपये पगार मिळतो. ही रक्कम यासाठी प्रत्येक वर्षी वापरणार आहे. कार्यकर्त्यांनी गावागावांत गरजू लोकांचा विमा उतरविण्यासाठी प्रयत्न करावेत. आय.सी.आय.सी.सी. बँकेचे कांचन कुलकर्णी म्हणाले, सर्वसामान्यांबद्दल आस्था असल्यामुळेच आ. मुश्रीफ यांनी हा संकल्प केला आहे. इतर लोकप्रतिनिधींसमोर त्यांनी आदर्श ठेवला आहे. दरवर्षी १२ लाख रुपये रक्कम ते मतदारसंघातील जनतेसाठी आपल्या उत्पन्नातून खर्च करणार आहेत, ही एक दुर्मीळ घटना आहे.माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांनी स्वागत, तर भैया माने यांनी प्रास्ताविक केले. संजय हेगडे, राहुल घोरपडे, शिवानंद माळी यांची भाषणे झाली. युवराज पाटील, गणपतराव फराकटे, नवीद मुश्रीफ, नगराध्यक्षा संगीता गाडेकर, मुरगूडच्या नगराध्यक्षा वसुधा कुंभार, रमेश माळी, प्रवीण भोसले उपस्थित होते. (प्रतिनिधी)