शहरं
Join us  
Trending Stories
1
ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट... पनवेल, नवी मुंबई, रायगडात पावसाची हजेरी, नागरिकांची तारांबळ
2
Latest Marathi News LIVE Updates: मध्य रेल्वेची सेवा आजही विस्कळीत, डोंबिवली स्थानकावर प्रचंड गर्दी; चाकरमान्यांचे हाल
3
ट्रम्प आता पाकिस्तानचेही ऐकेनात, इराणला दिली उघड धमकी; म्हणाले, “करार होत नाही तोपर्यंत...”
4
Raigad Crime: तरुणीचा रक्ताच्या थारोळ्यात विवस्त्र अवस्थेत सापडला मृतदेह; लॉजमध्ये हत्या करून आरोपी फरार
5
धडधड वाढली, युद्ध पुन्हा पेटणार? नेतन्याहू म्हणाले, "इराणमधील आमचे मिशन अजून बाकी आहे"; ट्रम्प यांचीही धमकी
6
“जिथे कोणी जात नाही तिथे मी जातो”; DCM शिंदेंचा दुर्गम भागापर्यंत विकास पोहोचवायचा निर्धार
7
IPL 2026: अवघ्या ३० रूपयांनी बदललं Ashwani Kumarचं नशीब; ४ बळी घेत Mumbai Indiansला जिंकवलं!
8
आजचे राशी भविष्य: २१ एप्रिल २०२६: हाती घेतलेली कामे पूर्ण होतील, 'या' राशींना धनलाभाचा योग
9
“महिला आरक्षणावरील चर्चेसाठी CM फडणवीसांनी PM मोदींनाही आणावे”; प्रणिती शिंदेंचे प्रतिआव्हान
10
Supreme Court: फक्त उच्च शिक्षण पुरेसे नाही, सरकारी नोकरीसाठी सर्वोच्च न्यायालयाने घातली अट!
11
शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींची भरभराट, नवीन नोकरीची संधी; उत्पन्नात वाढ, पण बजेट सांभाळा!
12
Learning License: लर्निंग लायसन्स प्रक्रिया पुन्हा 'ऑफलाईन'; गैरप्रकार रोखण्यासाठी आरटीओचे पाऊल
13
Government Employees Strike: सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर, त्यांच्या मागण्या काय आहेत? 
14
Jammu Ramnagar Bus Accident: चालकाचे नियंत्रण सुटलं, बस डोंगरावरून १०० मीटर खोल दरीत कोसळली, २१ जण ठार
15
Ashwini Paul: पार्टनरला भेटायला गेली अन् बनली ड्रग्ज सप्लायर, कोण आहे अश्विनी पॉल?
16
नेस्को ड्रग्ज प्रकरण: अनेक ड्रग्ज पेडलर्स, कॉन्सर्टमध्ये ‘विदाउट तिकीट’!
17
Donald Trump: शांतता करार आजच होणार; इराणचे शिष्टमंडळही पोहोचणार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
18
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
19
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
20
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
Daily Top 2Weekly Top 5

ट्रेसिंग, टेस्टिंग आणि सर्वेक्षणावर भर द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोना प्रतिबंधासाठी ट्रेसिंग, टेस्टिंग आणि सर्वेक्षण वाढविण्यावर भर द्या. ज्या अधिकारी-कर्मचारी यांची नोंदणी लसीकरणासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोरोना प्रतिबंधासाठी ट्रेसिंग, टेस्टिंग आणि सर्वेक्षण वाढविण्यावर भर द्या. ज्या अधिकारी-कर्मचारी यांची नोंदणी लसीकरणासाठी झालेली आहे, त्यांचे लसीकरण शुक्रवारपर्यंत होण्याची जबाबदारी त्या-त्या विभागप्रमुखांवर असेल. जे लसीकरण घेणार नाहीत, त्यांच्या नावासह खुलासा विभाग प्रमुखांनी सादर करावा, असे निर्देश पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना व नियोजनासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार प्रकाश आवाडे, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले, विदर्भात रुग्णसंख्या वाढत असून आपल्यालाही सतर्क राहावे लागेल. उपलब्ध असणारी साधनसामग्री यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत सर्वांनी दक्षता घ्यावी. ते सुस्थितीत ठेवण्याबाबत नियंत्रण करावे.

जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, प्रत्येक तालुक्यात एक तपासणी केंद्र हवे. आशा सेविका, आरोग्य सेवक यांच्यामार्फत इली, सारीचे रुग्ण शोधून त्यांची तपासणी करावी. प्रत्येक तालुक्याचा आढावा घेऊन पूर्ण नियोजन करावे. खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची तपासणीही करून त्यांचीही आरटीपीसीआर तपासणी झाली पाहिजे. आस्थापनांबाबतही समुपदेशन, प्रबोधन त्यानंतर नोटिसा देणं आणि दंड करणं, प्रसंगी परवाना रद्द करणं अशा पध्दतीने अंमलबजावणी करावी.

आयुक्त डॉ. बलकवडे म्हणाल्या, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग किमान २० पेक्षा जास्त व्हायला हवे. पोलिसांच्या मदतीने कारवाई करा. नियमांचे उल्लंघन होणार नाही हे पाहा. कोचिंग क्लासेस अशा ठिकाणी तपासणी करा.

मुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण म्हणाले, प्रबोधनाबरोबरच दंडात्मक कारवाई करा. हॉटेल्स, खानावळी याबाबत अधिक काळजी घ्या. लसीकरण करून घ्यावे.

पोलीस अधीक्षक बलकवडे म्हणाले, कोणत्याही यंत्रणेकडून तक्रार येताच संबंधितावर पोलिसांनी कारवाई करावी. विनामास्कबाबत प्रभावीपणे कारवाई करावी. लसीकरण वाढवावे.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साळे यांनी तालुकानिहाय सविस्तर आढावा घेऊन सूचना केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने, पाटबंधारेचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, प्रांताधिकारी वैभव नावडकर उपस्थित होते.

--

पालकमंत्र्यांनी केलेल्या सूचना..

प्रत्येक तालुक्यात एक कोविड काळजी केंद्र सुरू करता येईल, याबाबत तयारी ठेवा

सर्वेक्षणावर भर द्यावा.

शहरातील प्रमुख खासगी लॅबवर लक्ष देणे आवश्यक आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांनी या लॅबला भेटी द्याव्यात.

विनामास्क फिरणाऱ्यांवर कडक कारवाई

विनामास्क फिरणाऱ्यांवर पोलीस आणि महसूल यंत्रणेने कारवाई करावी. विनामास्क असणाऱ्यांना दुकानदारांनी प्रवेश देऊ नये. आपण सर्वांनीही मास्कचा वापर, सामाजिक अंतर आणि सॅनिटायझरचा वापर या त्रिसूत्रीचा वापर करावा. स्वत:हून लोकांनी उपाययोजना करावी, नियमांचे पालन करावे.

--

तालुकास्तरावर कोविड काळजी केंद्र तयार ठेवा : यड्रावकर

जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाय आणि नियोजनासाठी तालुकास्तरावर कोविड काळजी केंद्राची तयारी ठेवण्याची सूचना दिल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी बैठकीनंतर पत्रकारांना दिली. राज्य व जिल्ह्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरिकांनीही नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. आपली आणि आपल्या कुटुंबियांची दक्षता घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

---

फोटो नं २२०२२०२१-कोल-कोरोना आढावा बैठक

ओळ :

कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आढावा बैठक झाली. यावेळी भाऊसाहेब गलांडे, आमदार प्रकाश आवाडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हाधिकारी दौलत देसाई, मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, आयुक्त कादंबरी बलकवडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

---------