शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
2
हेमंत सोरेन यांना दिलासा नाहीच, सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 13 मे रोजी होणार!
3
“मोदींनी मान्य करावे की आता सत्तेत येत नाहीत”; पवार, ठाकरेंच्या ऑफरवर नाना पटोले थेट बोलले
4
"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल
5
नरहरी झिरवळ शरद पवार गटाच्या वाटेवर, चौथ्या टप्प्यातील मतदानापूर्वी महायुतीला मोठा धक्का
6
मोठी बातमी! दिल्लीचे सीएम अरविंद केजरीवाल यांना दिलासा, १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर
7
‘नकली शिवसेनावाले मला जिवंत गाडण्याच्या बाता मारताहेत, म्हणताहेत…’ नरेंद्र मोदींची टीका  
8
ते बालबुद्धीने बोलत असतात; अजितदादांनी डिवचताच शरद पवारांचा आक्रमक पलटवार
9
तुमच्याकडेही SBI चे क्रेडिट कार्ड असेल तर 'हे' जाणून घ्या; होऊ शकते मोठे नुकसान
10
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करतात गंगापूजा; त्याबरोबरच देवघरातील गंगेशी संबंधित नियम वाचा!
11
Gold Silver Price: गेल्या अक्षय तृतीयेला घेतलेल्या सोन्याची किंमत किती झाली माहितीये? दरात झालीये मोठी वाढ
12
'बिग बॉस' फेम अब्दु रोझिकच्या लग्नाची बातमी खोटी? जवळचा मित्र शिव ठाकरे म्हणाला...
13
“नरेंद्र मोदी लटकता आत्मा, आमचे पवित्र आत्मे त्यांच्यासोबत जाणार नाही”; संजय राऊतांचा पलटवार
14
Akshaya Tritiya 2024: सुखाचा व धनाचा कधीही होणार नाही क्षय; अक्षय्य तृतीयेला घरी आणा 'ही' मूर्ती!
15
"यूपीत इंडिया आघाडीचे वादळ, नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत", राहुल गांधींचा हल्लाबोल
16
देशातील पहिला डिजिटल भिकारी राजूचे Heart Attack ने निधन, QR कोडद्वारे मागायचा भीक
17
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates: काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा आमच्यासोबत याः नरेंद्र मोदी
18
काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा शिंदे, अजितदादांसोबत या; PM मोदींची उद्धव ठाकरे, शरद पवारांना खुली 'ऑफर'
19
'ज्या व्यक्तीचा...'; नरेंद्र मोदींच्या ऑफरवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
20
सलमान-अक्षयचे सिनेमे फ्लॉप का होताएत? श्रेयस तळपदेने दिलं उत्तर; म्हणाला, 'लोक थकले...'

चित्रपट महामंडळ डिजिटल करण्यावर भर- मेघराज राजेभोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 10:44 AM

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने स्वतंत्र यू ट्यूब चॅनेल, फेसबुक, टिष्ट्वटर अशा डिजिटल माध्यमांत प्रवेश केला आहे. या माध्यमांतून मराठी चित्रपटांचे हक्क विकून देण्याचा तसेच दर्जेदार चित्रपट निर्मिती व मराठी चित्रपटसृष्टीच्या वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी दिली.

ठळक मुद्दे चित्रपट महामंडळ डिजिटल करण्यावर भर- मेघराज राजेभोसले दर्जेदार चित्रपट निर्मितीला प्रोत्साहन

कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने स्वतंत्र यू ट्यूब चॅनेल, फेसबुक, टिष्ट्वटर अशा डिजिटल माध्यमांत प्रवेश केला आहे. या माध्यमांतून मराठी चित्रपटांचे हक्क विकून देण्याचा तसेच दर्जेदार चित्रपट निर्मिती व मराठी चित्रपटसृष्टीच्या वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी दिली.चित्रपट महामंडळाची सभा उद्या, रविवारी होत आहे. या पार्श्वभूमीवर ते म्हणाले, महामंडळाने कोल्हापूर व पुणे येथील कार्यालयांसाठी जागा खरेदी केली असून, आता मुंबर्ई येथील कार्यालयासाठीही जागेची पाहणी सुरू आहे. निर्माते व तंत्रज्ञ यांच्यातील आर्थिक तक्रार निवारण्यासाठी हमीपत्र सुुरू केले असून, स्त्री-कलावंतांचे प्रश्न सोडविण्यासाठी न्यायालयाने घालून दिलेल्या निकषांनुसार विशाखा समितीची स्थापना केली आहे. तसेच संवाद समिती स्थापन करून निर्माते, तंत्रज्ञ व कलावंत यांच्यातील वाद सोडविले आहेत. शालिनी सिनेटोनची जागा वाचविण्यात महामंडळाला यश आले आहे.ते म्हणाले, आगामी काळात जागतिक महोत्सवात मराठी चित्रपटांचा सहभाग वाढविणे, फिल्म बझारमध्ये त्यांचे प्रदर्शन, सभासदांसाठी पेन्शन व मेडिक्लेम विमा योजना राबविणे, वितरक मिळत नाहीत असे चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी योजना आखणे, अनुदान योजनेतील गुणांकन पद्धती बदलून श्रेणी पद्धत चालू करणे, निर्मात्यांना अनुदान वेळेवर व एकरकमी मिळावे यासाठी प्रयत्न करणार आहे.

लघुपट, वेब सीरिज, म्युझिक अल्बम, चित्रपट, माहितीपट निर्मात्यांना महामंडळाच्या अधिपत्याखाली आणणे, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी भरीव निधी तयार करणे, चित्रपट परवानगीसाठी शासनाने सुरू केलेली एक खिडकी योजना महाराष्ट्रभर सुरू करावी यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे. तसेच ‘म्हाडा’च्या घरांसाठी महामंडळाच्या राखीव कोट्याची मागणी करण्यात येणार आहे. साहित्य व नाट्य संमेलनाच्या धर्तीवर चित्रपट संमेलनाचे आयोजन करण्याचाही मानस आहे. परिषदेस धनाजी यमकर, अर्जुन नलवडे, सुरेंद्र पन्हाळकर, अरुण चोपदार यांच्यासह सभासद उपस्थित होते.तो वाद सभासदांमधीलकाही दिवसांपूर्वी महामंडळासमोर मिलिंद अष्टेकर यांच्या निर्दोष मुक्ततेवरून झालेल्या पोस्टरबाजीबाबत विचारले असता ते म्हणाले, हा दोन सभासदांमधील वैयक्तिक वाद आहे. त्यात महामंडळाचे नाव यायला नको होते. महामंडळाच्या नियमात ते बसत नाही; त्यामुळे आम्ही त्यांना नोटिस पाठवली आहे. वाद तुमच्यातच मिटवून घ्या, असे त्यांना सांगितले आहे. 

 

टॅग्स :cultureसांस्कृतिकkolhapurकोल्हापूर