शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

शाॅपीतील मोबाईल परस्पर विकून साडेतीन लाखांचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:55 IST

कोल्हापूर : व्यवस्थापक पदाचा तात्पुरता कार्यभार असताना मोबाईल कंपनीच्या शाखेतील सुमारे २५ मोबाईल परस्पर विकून सुमारे ३ लाख ५१ ...

कोल्हापूर : व्यवस्थापक पदाचा तात्पुरता कार्यभार असताना मोबाईल कंपनीच्या शाखेतील सुमारे २५ मोबाईल परस्पर विकून सुमारे ३ लाख ५१ हजार २४१ रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार बसंत-बहार चित्रमंदिर मार्गावरील एका मोबाईल शॉपीत घडला. याप्रकरणी मोबाईल कंपनीचे ग्राहक सेवा प्रतिनिधी सचिन प्रकाश शेडबाळे (रा, रामकृष्ण परमहंस सोसायटी, जगदाळे मळा, सांगली) यांच्यावर शाहुपुरी पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बसंत बहार चित्रमंदिर मार्गावरील एका मोबाईल कंपनीच्या शाखेत राकेश रवींद्र पाटील (वय ३१, रा. न्यू हडको कॉलनी, अयोध्या थिएटरनजीक, चैतन्य नगर, सांगली) हे व्यवस्थापक आहेत. ते दिनांक २० फेब्रवारी ते १५ मार्च २०२० या कालावधीत रजेवर होते, त्या कालावधीत व्यवस्थापक पदाचा तात्पुरता कार्यभार हा कंपनीचे ग्राहक सेवा प्रतिनिधी सचिन शेडबाळे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. यावेळी कंपनीच्या कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याची परवानगी न घेता शेडबाळे यांनी कंपनीच्या सुमारे ३ लाख ५१ हजार २४१ रुपये किंमतीच्या २५ मोबाईलची परस्पर विक्री करुन त्या रकमेचा अपहार केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या अपहारप्रकरणी शाहुपुरी पोलीस ठाण्यात सचिन शेडबाळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.