आदमापुरात बाळूमामा भक्तांचा मनोहर भोसलेविरोधात एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:28 IST2021-09-05T04:28:40+5:302021-09-05T04:28:40+5:30

सरवडे : आदमापूर (ता. भुदरगड) येथील सदगुरू बाळूमामांच्या ५५ व्या समाधी दिनानिमित्त आदमापूर गावच्या नागरिकांसह भक्तगण एकत्र येत ...

Elgar against Manohar Bhosale of Balumama devotees in Adamapur | आदमापुरात बाळूमामा भक्तांचा मनोहर भोसलेविरोधात एल्गार

आदमापुरात बाळूमामा भक्तांचा मनोहर भोसलेविरोधात एल्गार

सरवडे : आदमापूर (ता. भुदरगड) येथील सदगुरू बाळूमामांच्या ५५ व्या समाधी दिनानिमित्त आदमापूर गावच्या नागरिकांसह भक्तगण एकत्र येत बाळूमामांच्या नावाचा वापर करणाऱ्या मनोहर भोसले याच्याविरोधात दंड थोपटले आहेत. बाळूमामाच्या कण्या, ताक, प्रसाद घेऊन मनोहर भोसलेसह सर्वच भोंदू बाबांचा निषेध करण्यात आला.

बाळूमामांचा आज ४ सप्टेंबर या समाधीदिनानिमित्त ताक, कण्याच्या वाटपप्रसंगी आयोजित सभेत हा निषेध करण्यात आला. अध्यक्षस्थानी देवालय समितीचे अध्यक्ष धैर्यशील भोसले होते. यावेळी बाळूमामा देवालय समितीचे कार्याध्यक्ष रामभाऊ मगदूम, माजी सरपंच दत्तात्रय पाटील, गोकुळचे माजी संचालक दिनकरराव कांबळे, एम. डी. पाटील ॲड. राजेंद्र देशमुख प्रमुख उपस्थितीत होते.

यावेळी सरपंच विजय गुरव यांनी मनोहर भोसले यांनी बाळूमामांच्या नावाचा वापर करून आर्थिक लूट केली. वंशज, अवतार, शिष्य अशी नावे परिधान करून भक्तांची दिशाभूल केली. भक्तांमध्ये चुकीचा संदेश देऊन अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचे काम केले. भविष्यात असे भोंदू, अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे तयार होऊ नयेत, याची जबाबदारी भक्तांनी घ्यावी, असे त्यांनी आवाहन केले.

प् रा. एस. पी. पाटील, मच्छिंद्र टिंगरे, दिनकरराव कांबळे, दयानंद कोणीकेरी, सतीश जाधव, धनाजी पाटील, आनंदा पाटील, नामदेव पाटील यांनी मनोहर भोसलेचा समाचार घेतला. बाळूमामांच्या नावाने चांगभलं म्हणून भंडारा लावून जर कोणी भक्ताला लुबाडायचा प्रयत्न करणार असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाही. अशा भोंदू महाराजांना भक्तांनी थारा देऊ नये, असे आवाहन केले.

यावेळी सतीश जाधव, रुकडीकर मामा, एस. के. पाटील, गुंडोपंत पाटील, सुधीर पाटील, अमर पाटील, प्रकाश खापरे, काशिनाथ शिंणगारे, एल. जी. पाटील, पी. एल. पाटील, यशवंतराव कळमकर, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. एन. एच. पाटील यांनी स्वागत केले.

Web Title: Elgar against Manohar Bhosale of Balumama devotees in Adamapur