शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

अकरा गावांचा उद्यापासून पाणीपुरवठा बंद

By admin | Updated: September 3, 2015 00:19 IST

थकबाकीपोटी जीवन प्राधीकरणाची कारवाई : गांधीनगर, कणेरी, उजळाईवाडी, उचगाव आदींचा समावेश

कोल्हापूर : गांधीनगर, उचगाव, गडमुडशिंगीसह अकरा गावांनी पाणीपट्टीच थकवल्याने या गावांचा शुक्रवार (दि. ४) पासून पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाने घेतला आहे. या गावांकडे तब्बल २ कोटी ५२ लाखांची थकबाकी असून, एकट्या उचगाव ग्रामपंचायतीकडे १ कोटी २५ लाख रूपये अडकल्याने प्राधीकरणच अडचणीत आले आहे.करवीर तालुक्याच्या पूर्वेकडील गांधीनगर, गडमुडशिंगी, वळीवडे, सरनोबतवाडी, उजळाईवाडी, नेर्ली, तामगाव, गोकुळ शिरगाव, कणेरी, मोरेवाडी, उचगाव या गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी गांधीनगर प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजना मे २००३ ला सुरू केली. महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाच्या माध्यमातून ही योजना कार्यरत आहे. पूर्वी या योजनेत हलसवडे, सांगवडे, सांगवडेवाडी, चिंचवाड, वसगडे या गावांचा समावेश होता, पण नंतर या गावांना वगळण्यात आले. या पाणी योजनेची बिले ग्रामपंचायतींना महिन्याला द्यावी लागतात. पण ही योजना सुरू झाल्यापासूनच थकबाकीचे गळते या योजनेला लागले आहे. हे गळते निघत नसल्याने संपूर्ण योजनाच अडचणीत आली आहे.आतापर्यंत या अकरा गावांकडे अडीच कोटीच थकबाकी आहे. त्यातील उचगाव ग्रामपंचायतीकडे १ कोटी २५ लाख रूपये थकीत असल्याने प्राधीकरण मेटाकुटीला आलेले आहे. प्राधीकरणाला योजनेचे वीज बिल महिन्याला १८ ते २० लाख रूपये येते, पण पाणीपट्टीची वसुलीच नसल्याने पैसे भरायचे कसे? असा पेच प्राधीकरणासमोर आहे. यापूर्वी दोन वेळा प्राधीकरणाने पाणीपुरवठा बंद केला होता. पैसे भरण्याचे आश्वासन देण्यात आले होते. गांधीनगर ग्रामपंचायतीचा चेक बाऊन्स गांधीनगर ग्रामपंचायतीने थकबाकीपोटी जीवन प्राधीकरणाला पुढील तारखेचा धनादेश दिला होता. पण हा धनादेश वटला नाही, त्यामुळे ग्रामपंचायतीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मग ग्रामस्थांचा काय दोषअकरा गावांतील बहुतांशी ग्रामस्थ आपले पाण्याचे बिल वेळेत अदा करतात, पण तो पैसा ग्रामपंचायत इतरत्र खर्च करते. थकाबाकीपोटी प्राधीकरण पाणी बंद करणार, मग यात ‘त्या’ ग्रामस्थांचा काय दोष? असा सवाल उपस्थित केला जात आहे.