शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

साडेअकरा हजार लिटर लस साठवणुकीची क्षमता नावनोंदणीशिवाय लस नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 11:17 AM

CoronaVirusUnlock, Kolhapur, CPR Hospital कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक साडेअकरा हजार लिटर लस साठवणूक करण्याची क्षमता असून, या माध्यमातून ४५ लाख ३९ हजार सात डोस दिले जाणार आहेत. मात्र पोर्टलवर नावनोंदणी केल्याशिवाय कोणालाही लस उपलब्ध होणार नाही.

ठळक मुद्देसाडेअकरा हजार लिटर लस साठवणुकीची क्षमता नावनोंदणीशिवाय लस नाही४५ लाखांहून अधिक डोस होणार उपलब्ध

समीर देशपांडेकोल्हापूर : जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक साडेअकरा हजार लिटर लस साठवणूक करण्याची क्षमता असून, या माध्यमातून ४५ लाख ३९ हजार सात डोस दिले जाणार आहेत. मात्र पोर्टलवर नावनोंदणी केल्याशिवाय कोणालाही लस उपलब्ध होणार नाही.कोरोनाची लस देण्यासाठीचे नियोजन सर्वच पातळ्यांवर सुरू आहे. जानेवारी २०२१ च्या दुसऱ्या आठवड्यात लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. नंतरच्या आठ दिवसांमध्ये गट अ मधील अधिकारी, कर्मचाऱ्यांना लस दिली जाईल. ही संख्या २० हजारांच्या पुढे आहे. यानंतर लगेचच दुसरा टप्पा सुरू होईल. ब गटासाठी दुसरा टप्पा असून यामध्ये संख्या अधिक असणार आहे. त्यानंतर क गटासाठी लसीकरण सुरू होणार आहे. तिसरा टप्पाही जास्त दिवस चालण्याची शक्यता आहे.अ गट

  • वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, नर्सेस, सरकारी आणि खासगी रुग्णालयांतील सर्व कर्मचारी, वैद्यकीय महाविद्यालयातील अधिकारी, कर्मचारी, आशा वर्कर्स, अंगणवाडी कर्मचारी.

ब गट

  • पोलीस दल, नागरी दल, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका कर्मचारी.

क गट

  • ५० वर्षांवरील सर्व नागरिक आणि ज्यांना जुने आजार आहेत असे नागरिक

दोन, तीन वेळा डोस घ्यावे लागणारशासनाकडून चार कंपन्यांचे व्हॅक्सिन पुरवण्यात येणार आहेत. यातील एका कंपनीचे डोस दोन वेळा घ्यावे लागणार आहेत; तर तीन कंपन्यांचे डोस तीन वेळा घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे हीच प्रक्रिया पुन्हा राबवावी लागणार आहे. 

  • लस साठवण उपलब्धता
  • जिल्हास्तरीय : ६८७ लिटर
  • जिल्हा परिषद व नगरपालिका : ९१३१ लिटर
  • कोल्हापूर महापालिका : १५२६ लिटर

एकूण : ११,३४४ लिटरतालुकानिहाय लस साठवण क्षमता (लिटरमध्ये)

  • हातकणंगले १३८१
  • करवीर १०६३
  • शिरोळ ७३४
  • राधानगरी ७१६
  • शाहूवाडी ७०२
  • गडहिंग्लज ६९९
  • पन्हाळा ६२३
  • कागल ५८५
  • चंदगड ४६६
  • भुदरगड ३२९
  • आजरा ३२३
  • गगनबावडा १३८

सध्या पहिल्या टप्प्यातील अ गटातील लस देण्यासाठी पात्र असणाऱ्यांची माहिती भरण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. साठवणुकीची जिल्ह्याची क्षमता चांगली असल्याने लस टंचाईचा प्रश्र्न येणार नाही-दौलत देसाईजिल्हाधिकारी कोल्हापूर.

 

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकkolhapurकोल्हापूरCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय