शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
4
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
5
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
6
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
7
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
8
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
9
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
10
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
11
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
12
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
13
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
14
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
15
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
16
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
17
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
18
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
19
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
20
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
Daily Top 2Weekly Top 5

तालुका शेतकरी संघाची निवडणूक अटीतटीची होणार

By admin | Updated: October 18, 2015 23:56 IST

भुदरगड तालुका : दोन्ही गटांकडून तगडे आव्हान; २३ हजार सभासद पात्र केल्याचा मुद्दा कळीचा

शिवाजी सावंत-गारगोटी भुदरगड तालुक्यातील सर्वांत मोठा आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांसह सभासदांच्या जिव्हाळ्याचा असणाऱ्या भुदरगड तालुका शेतकरी संघाची निवडणूक चांगलीच अटीतटीची होणार असून, निकालाच्यादृष्टीने ऐतिहासिक ठरणार असल्याने २५ आॅक्टोबरला होणाऱ्या निवडणुकीकडे जिल्ह्यातील सर्व राजकीय नेतेमंडळींचे लक्ष लागले आहे. या लक्ष्यवेधी निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी तगडे उमेदवार उभे करण्यात यश मिळविले आहे, तर विरोधी गटाने २३ हजार सभासद पात्र केल्याचा मुद्दा उपस्थित करून कडवे आव्हान उभे केले आहे. १ आॅगस्ट १९५६ रोजी या संघाची स्थापना कम्युनिस्ट नेते बी. जी. देसाई, शंकरराव मोरबाळे, आदी कम्युनिस्टवादी विचारांच्या नेत्यांनी एकत्र येऊन केली. त्यावेळी साखर कारखाने नव्हते; पण उसापासून गूळ उत्पादित केला जात होता. हा गूळ स्थानिक व्यापारी खरेदी करून कोल्हापूरला नेऊन विकत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या गुळाचा भाव व्यापारी ठरवित असत. या सर्व बाबींचा विचार करून सर्व कम्युनिस्टांनी संघाची स्थापना केली. संघातर्फे स्वस्त धान्ये, रासायनिक खते, कपडे, हार्डवेअर, गूळ खरेदी यांसारखे उपक्रम सुरू केले. निवडणुकीसाठी ५० लाख रुपये खर्च होणार होता. शिवाय संघाची आर्थिक स्थिती बिकट असल्यामुळे त्यांनी हे सभासद कमी करण्याचा निर्णय घेतला; पण सभासद कमी करताना कोणतेही सबळ कारण सभासदांना न कळविता हे सभासद कमी केले. या विरोधात विजय आबिटकर, विजय कोटकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पंडितराव केणे, सदाशिव देवर्डेकर या मंडळींनी निवडणूक अधिकारी तथा सहायक निबंधक कार्यालयावर मोर्चा काढला; पण त्यांना न्याय न मिळाल्याने माजी आमदार बजरंग देसाई व माजी आमदार के. पी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने सर्व सभासद पात्र ठरविल्याने ही निवडणूक खऱ्या अर्थाने सभासदांच्या हातात गेली आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांकडून प्रयत्न चालले होते; पण योग्य असा सुवर्णमध्य न निघाल्याने अखेर निवडणूक लागलीच. सत्ताधारी गटातून माजी आमदार दिनकरराव जाधव, विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर, राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन प्रथमच पटलावर आलेले बिद्रीचे संचालक कोकण केसरी के. जी. नांदेकर, वसंतराव देसाई या नेतेमंडळींनी दिग्गज उमेदवार उभे करून विरोधकांना चांगलाच धसका दिला आहे, तर विरोधी गटातील माजी आमदार के. पी. पाटील, माजी आमदार बजरंग देसाई, कॉ. सम्राट मोरे, भाजपचे नाथाजी पाटील, अलकेश कांदळकर, प्रा. बाळ काका देसाई या नेत्यांनी सर्वसामान्य उमेदवार उभे करून सामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. या गटातील नेतेमंडळी २३ हजार सभासद पात्र केल्याचा मुद्दा घेऊन रिंगणात उतरले आहेत. याशिवाय सभासद पात्र करण्यासाठी संघाने न्यायालयात केलेला खर्च, कारभार यांसारखे मुद्दे घेऊन मैदानात उरतले आहेत.१संघाच्या इतिहासात कधी झाली नसेल अथवा यापुढे होणार नाही, अशी ही ऐतिहासिक निवडणूक होणार आहे. दोन्हींकडून विजयासाठी दावा केला जात असला, तरी इथला स्वाभिमानी सभासद नेमके काय करणार? सत्ताधारी की सत्तांतर? हे निकालानंतर समजेल. सध्या सभासद सावध प्रतिक्रिया देत आहेत. २दोन्ही गट तुल्यबळ असल्याने ही निवडणूक अटीतटीची होण्याचे संकेत आहेत. प्रचारातील बाजी आणि संपर्कावर ही निवडणूक गाजणार आहे. प्रचार प्रारंभापासून फैरी झडण्यास सुरुवात झाली आहे. विरोधकांच्या आक्रमकतेला सत्ताधारी कसे थोपविणार, यावर ते कोणती उपाययोजना करून व्यूहरचना करणार ते लवकरच समजेल.३१९७० पर्यंत संघावर कम्युनिस्टांची सत्ता होती. ७० नंतर पक्षाला आणि कार्यकर्त्यांना ओहोटी लागली. यापूर्वी संघाने स्थावर, गोडावून खरेदी करून चांगलेच बस्तान बसविले होते. संघाची व्याप्ती वाढत जाईल, तशी सभासद संख्या वाढत गेली. ती २५ हजार ४८२ व्यक्ती सभासद आणि ६२० संस्था सभासद झाल्या. या संघावर वसंतराव देसाई यांची निर्विवाद सत्ता होती. त्यांनीही निवडणूक लागण्यापूर्वी त्यातील २३ हजार ८३५ व्यक्ती सभासद आणि ४६२ संस्था गटातील सभासद कमी केले.