शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

वृद्ध आई-वडिलांसाठी मुलगीच बनली श्रावणबाळ

By admin | Updated: December 19, 2014 00:30 IST

संसारावर तुळशीपत्र ठेवून सुरू आहे सेवा : समाजातील दानशूरांकडून अश्विनीला हवाय मदतीचा हात

अनिल पाटील - मुरगूड -‘म्हातारपण नको गा देवा’ असा सूर सर्वत्र पाहावयास मिळतो. कारण उतरत्या वयात वृद्ध पती-पत्नीला एकमेकांचाच आधार बनावा लागतो, तर काहींना वृद्धाश्रमाचा रस्ता धरावा लागतो; पण याला अपवाद आहे मुरगूडमधील घटना. लग्न होऊन आपल्या पती, मुलांबरोबर आनंदात राहण्याचे सोडून गेल्या तीन वर्षांपासून अश्विनी आपल्या वृद्ध आई-वडिलांची सेवा-शुश्रूषा करत आहे. संधिवाताने दोन्हीही पायाने अधू झालेल्या आपल्या आईला स्वत:च्या पायावर उभा करूनच आपल्या संसाराकडे परतणार, या अश्विनीच्या निश्चयामुळे वंशाला दिवाच पाहिजे, अशा मानसिकतेमध्ये अडकलेल्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन आहे. वृद्ध आई-वडिलांची सेवा करून आधुनिक काळातील ‘श्रावणबाळ’ ठरलेल्या अश्विनीला मात्र आईच्या शस्त्रक्रियेसाठी समाजाचे पाठबळ हवे आहे.कोगनोळी (ता. चिकोडी) येथील आप्पासाहेब कदम हे व्यवसायाने डॉक्टर. अत्यल्प फीमध्ये लोकांवर उपचार करणारे म्हणून त्यांची ओळख. त्यांच्या पत्नी उर्मिला यांना संधिवाताचा त्रास सुरू झाला. अगदी थोडा थोडा वाटणारा त्रास हा पुढे इतका वाढला की, त्यांना चालता, उठता येईना. त्यांना पुण्याच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. शस्त्रक्रियेसाठी मोठा खर्च झाला. खर्चापोटी कदम यांनी आपली शेती, जमीन आणि घरही विकले. शस्त्रक्रिया झाली; तरीसुद्धा त्रास कमी होण्याऐवजी वाढतच गेला. दैवाला दोष देत कदम कुटुंब मुरगूडमध्ये वास्तव्याला आले. पाच वर्षांपूर्वी दिंगणघाट (ता. वर्धा) येथील सधन कुटुंबातील मुलाबरोबर अश्विनीचे लग्न झाले. अश्विनी आपल्या संसारात सुखी होती; पण तीचे मन मात्र आई -वडिलांकडेच धावत होते. शेवटी ती एक वर्षांच्या छोट्या मुलासह मुरगूडमध्ये दाखल झाली आणि आपल्या आईची सेवा सुरू केली; पण नियतीने पुन्हा एकदा प्रताप दाखवला. वडिलांच्या हृदयामध्ये अडथळा निर्माण झाल्याने त्यांनाही रुग्णालयात दाखल करावे लागले.