रुकडी येथे आठ दिवस जनता कॅर्फ्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:24 IST2021-04-28T04:24:41+5:302021-04-28T04:24:41+5:30

खासदार माने यांनी नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे व लॉकडाऊन काळात कडक निर्बंध पाळावेत, तसेच घरगुती प्राणायाम, योगासने यासारखे सुदृढ, ...

Eight-day public curfew at Rukdi | रुकडी येथे आठ दिवस जनता कॅर्फ्यू

रुकडी येथे आठ दिवस जनता कॅर्फ्यू

खासदार माने यांनी नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे व लॉकडाऊन काळात कडक निर्बंध पाळावेत, तसेच घरगुती प्राणायाम, योगासने यासारखे सुदृढ, निरोगी आरोग्यासाठी उपाय अवलंबवावेत असे आव्हान केले. ग्रामस्थांना तातडीने वैद्यकीय उपचार करता यावेत यासाठी कायमस्वरूपी रुग्णवाहिका देण्यात येईल, असे खा. मानेे यांनी याप्रसंगी सांगितले.

हेर्ले प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल देशमुख यांनी अँटिजेन टेस्टसाठी स्थानिक ग्रामपंचायतीने मनुष्यबळ द्यावे, अशी मागणी करून या आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या सहा गावात ७७ रुग्ण कोरोनाग्रस्त असल्याचे सांगितले.

रुकडीमध्ये ८६ रुग्णांपैकी ४४ रुग्णांच्यावर उपचार सुरू असून, आजपर्यंत १५२३७ नागरिकांची प्राथमिक तपासणी आशा कर्मचारी यांच्यावतीने करण्यात आली आहे. अद्याप तीन हजार नागरिकांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

Web Title: Eight-day public curfew at Rukdi