Kolhapur: संपादक ज्ञानेश महाराव यांच्यावर गुन्हा, धार्मिक भावना दुखावल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2024 12:05 IST2024-09-10T12:05:36+5:302024-09-10T12:05:53+5:30

कोल्हापूर : ज्येष्ठ लेखक, संपादक ज्ञानेश महाराव यांनी भाषणातून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे. याबाबत संदीप ...

Editor Dyanesh Maharao accused of crime in Kolhapur, Hindutva organizations for hurting religious sentiments | Kolhapur: संपादक ज्ञानेश महाराव यांच्यावर गुन्हा, धार्मिक भावना दुखावल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप

Kolhapur: संपादक ज्ञानेश महाराव यांच्यावर गुन्हा, धार्मिक भावना दुखावल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप

कोल्हापूर : ज्येष्ठ लेखक, संपादक ज्ञानेश महाराव यांनी भाषणातून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे. याबाबत संदीप निवृत्ती सासने (वय ४३, रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर) यांनी सोमवारी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, पोलिसांनी महाराव यांच्यावर गुन्हा दाखल केला.

नवी मुंबई येथील वाशी येथे २२ ऑगस्टला संभाजी ब्रिगेडचे राज्यस्तरीय अधिवेशन झाले. त्यावेळी महाराव यांनी त्यांच्या भाषणातून आक्षेपार्ह विधाने केली. देव-देवता, संत यांच्याबद्दल चुकीची माहिती देऊन हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या, असा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे.

याबाबत महाराव यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, चौकशीनंतर पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली.

Web Title: Editor Dyanesh Maharao accused of crime in Kolhapur, Hindutva organizations for hurting religious sentiments