Kolhapur News: विवाह सोहळ्यात उपस्थितांना भेट दिली देशी झाडे अन् कापडी पिशवी, झावरे कुटुंबियाने दिला पर्यावरणपूरक संदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 16:28 IST2023-06-23T14:33:08+5:302023-06-23T16:28:25+5:30
सुहास जाधव पेठवडगाव : येथील झावरे कुटूंबियाने आपल्या मुलीच्या विवाह सोहळ्यात उपस्थितांना देशी झाडे अन् कापडी पिशवी भेट देवून ...

Kolhapur News: विवाह सोहळ्यात उपस्थितांना भेट दिली देशी झाडे अन् कापडी पिशवी, झावरे कुटुंबियाने दिला पर्यावरणपूरक संदेश
सुहास जाधव
पेठवडगाव : येथील झावरे कुटूंबियाने आपल्या मुलीच्या विवाह सोहळ्यात उपस्थितांना देशी झाडे अन् कापडी पिशवी भेट देवून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. प्रा. प्रमोद व प्रिती झावरे यांची मुलगी श्रेया हिचा संजय व जयश्री आणुजे यांचा मुलगा प्रवण सोबत आज शुक्रवारी (दि.२३) विवाह सोहळा संपन्न झाला. या अनोख्या विवाह सोहळ्याचे परिसरात कौतुक होत आहे.
वडिल पर्यावरणाचे प्राध्यापक. प्रतिवर्षी पर्यावरण दिनाला आपल्या विद्यार्थ्यांना कापडी पिशवी देतात. आता मुलगी श्रेया हिने लग्न पत्रिकेतून तसेच विवाह सोहळ्यात उपस्थितांना देशी झाडे अन् कापडी पिशवी भेट देत पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला आहे. वडिल व मुलगीच्या पर्यावरण जाणिव कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
श्रेयाने तिच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी दिलेल्या निमंत्रण पत्रिकेच्या मागील बाजूस पर्यावरण दिनाची थीम छापली होती. यासोबतच पर्यावरण रक्षणाचा संदेशही दिला होता. ज्यामध्ये प्लॅस्टिकमुळे होणारी हानी, दुष्परिणाम इत्यादींबाबत माहिती देण्यात आली.
ॐ पर्यावरणाय नमः ॥ असे म्हणत वृक्षाबाबत कृतज्ञता व्यक्त करून महत्त्व विषद केले आहे. तर ॐ पंचमहाभूताय नमः असे म्हणत झाडे लावू झाडे जगवू सेंद्रीय शेती करू ध्वनिप्रदूषण कमी करून स्वच्छतेतून समृध्दीकडे जावा, देश सुजलाम आणि सुफलाम व्हावा असे आवाहन करत लग्नाचे आमंत्रण दिले आहे.