शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

पाचवी मुलगी झाल्याने ‘नकुशी’ला सोडले

By admin | Updated: May 22, 2016 01:01 IST

आईची कबुली : ऋणमुक्तेश्वरजवळ सापडलेल्या ‘त्या’ नवजात बालिकेच्या आई-वडिलांचा ४८ तासांत छडा

कोल्हापूर : दोन मुलींनंतर तिसरा मुलगा झाला. त्यानंतर चौथी मुलगी झाली आणि पाचवा मुलगाच होईल, अशी आशा होती; परंतु, मुलगी झाली. तिचा सांभाळ आपला भाऊ करील, म्हणून तिला भावाच्या दारातच सोडून आल्याची कबुली ‘नकुशी’च्या आईने लक्ष्मीपुरी पोलिसांसमोर शनिवारी दुपारी दिली. हसीना रशीद सय्यद (वय ४०) व रशीद जब्बार सय्यद (४२, रा. शाहू कॉलेजनजीक, विचारेमाळ, कोल्हापूर) असे या नकुशीच्या आई-वडिलांचे नाव आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दोन दिवसांपूर्वी गंगावेश परिसरातील ऋणमुक्तेश्वर मंदिराजवळील एका बोळामध्ये प्लास्टिकच्या पिशवीत दोन दिवसांची नवजात बालिका सापडली होती. तिच्या आई-वडिलांचा छडा पोलिसांनी ४८ तासांत लावला आहे. असा लागला छडानवजात बालिकेला रस्त्यावर कोणी टाकले, ती कोणाची आहे याचा लक्ष्मीपुरी पोलिस रात्रंदिवस कसून शोध घेत होते. दोन दिवसांत पोलिसांनी शहरातील १६५ घरांमध्ये चौकशी केली. हा तपास सुरू असताना पोलिस हवालदार अजित वाडेकर यांना सदर बझार येथून एक फोन आला. विचारेमाळ येथे एका महिलेची प्रसूती झाली आहे; परंतु तिच्याजवळ बाळ मात्र दिसत नाही, असे त्यात म्हटले होते. वाडेकर यांनी फोन बंद करून काही क्षणांतच विचारेमाळ गाठला. या ठिकाणी हसीना व तिचा पती रशीद यांच्याकडे चौकशी केली. त्यांनी आम्हाला बाळ झालेले नाही, असे उत्तर दिले. पोलिसांनी आजूबाजूला चौकशी केली असता हसीना गर्भवती होती. तिची प्रसूती झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर मात्र पोलिसांनी दरडावून विचारताच सय्यद दाम्पत्याने कबुली दिली. या नवजात बालिकेची प्रकृती स्थिर आहे. पोलिस आणि न्यायालयाच्या अहवालानंतर तिचा ताबा पालकांना देण्यात येईल.- डॉ. शिशिर मिरगुंडे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक, सीपीआर, कोल्हापूरगुरुवारी पहाटे मध्यवर्ती बसस्थानक येथे मुलीला घेऊन आले. त्यानंतर रिक्षाने ऋणमुक्तेश्वर मंदिर येथे आले. त्याठिकाणी भाऊ सलीम शेख याच्या दारात ठेवून गेले. पतीचा मुलगी सांभाळ्ण्याचा विरोध नव्हता.- हसीना सय्यद, ‘नकुशी’ची आईभारतीय दंडविधान संहिता कलम ३१७ प्रमाणे संशयित हसीना सय्यद व तिचा पती रशीद यांच्यावर गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात सात वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. या दोघांना त्यांची नोटीस दिली आहे. बाळाचा ताबा शासकीय महिला व बालकल्याण समितीकडे देणार आहे. बाळाच्या जीविताचे बरेवाईट झाल्यास आईवडिलांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल. - मनीषा गभाले, पोलिसउपनिरीक्षक, लक्ष्मीपुरी पोलिस ठाणे.सध्या ही बालिका बालकल्याण समितीच्या ताब्यात आहे. तिच्यावर ‘सीपीआर’मध्ये उपचार सुरू आहेत. तिला डिस्चार्ज मिळाल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल.- अतुल देसाई, सदस्य, बालकल्याण समिती.