विनय कोरे यांच्या हस्ते जाखलेतील धनगर समाजाला ढोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:28 IST2021-09-15T04:28:00+5:302021-09-15T04:28:00+5:30

जाखले येथील विशेष कार्यकारी अधिकारी व जाखले-बहिरेवाडी पाणी-पुरवठा संस्थेचे संचालक महादेव देशमुख यांनी सामाजिक बांधिलकी समोर ठेवून धनगर समाजाला ...

Drums to the Dhangar community in Jakhale by Vinay Kore | विनय कोरे यांच्या हस्ते जाखलेतील धनगर समाजाला ढोल

विनय कोरे यांच्या हस्ते जाखलेतील धनगर समाजाला ढोल

जाखले येथील विशेष कार्यकारी अधिकारी व जाखले-बहिरेवाडी पाणी-पुरवठा संस्थेचे संचालक महादेव देशमुख यांनी सामाजिक बांधिलकी समोर ठेवून धनगर समाजाला पाच धनगरी ढोल आमदार विनय कोरे यांच्या हस्ते अध्यक्ष ईश्वर शिंदे यांच्याकडे दिले तसेच पन्हाळ्यातील जनसुराज्याचे युवा सरपंच कै. नितीन पाटील फाऊंडेशनला पाच हजारांची रोख रक्कम महादेव देशमुख यांनी आमदार कोरे यांच्याकडे दिली.

या वेळी माजी समाजकल्याण सभापती विशांत महापुरे, जनसुराज्याचे संपर्कप्रमुख रवींंद्र जाधव, माजी सभापती रणजित शिंदे-सरकार, डॉ. बी. टी. साळोखे, विश्वास जाधव, इंजि. राहुल देशमुख, भैय्या साळोखे, संदीप खोंद्रे, सदस्य दीपक शिंदे, सरदार देशमुख, आशुतोष माने, अरुण बोराटे, तानाजी चौगुले,अशोक देशमुख इतर पदाधिकारी उपस्थित होते.

फोटो ओळी-जाखले येथील धनगर समाजाला धनगरी ढोल आमदार विनय कोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी विशांत महापुरे, रवींंद्र जाधव, रणजित शिंदे-सरकार, महादेव देशमुख, राहुल देशमुख बी. टी. साळोखे उपस्थित होते.

Web Title: Drums to the Dhangar community in Jakhale by Vinay Kore